शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था

By admin | Updated: May 22, 2017 23:39 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातून जाणाऱ्या सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील तुळजापूर ते उमरगा या दरम्यानचा मार्ग अत्यंत खराब झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : जिल्ह्यातून जाणाऱ्या सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील तुळजापूर ते उमरगा या दरम्यानचा मार्ग अत्यंत खराब झाला आहे़ वाहन चालकांना जीव मुठीत घेवून या रस्त्यावरुन प्रवास करावा लागत आहे. या महामार्गाच्या दुरवस्थेला कारणीभूत असलेल्या संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी केली आहे.तुळजापूर-उमरगा या दरम्यान रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम मागील अनेक वर्षापासून सुरु आहे. विशेष म्हणजे सदर कामात मोठ्या प्रमाणात दिरंगाई झाली असल्याने महामार्गावर ठिकठिकाणी खड्यांचे साम्राज्य आहे. रस्त्यावरील खड्डे आणि कंत्राटदाराकडून नुतनीकरणासाठीचे साहित्य रस्त्याच्या बाजूलाच टाकले आहे़ त्यामुळे या महामार्गावर मागील काही वर्षात अपघात अपघातात वाढ झाली आहे़ अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नवीन डांबरीकरणाचे कामही दर्जेदार झालेले नसल्याने वाहनचालकांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र हद्दीबाहेर जाणाऱ्या याच महामार्गाचे काम अतिशय चांगल्या प्रकारे सुरु असताना तुळजापूर-उमरगा महामार्गाची अशी दुरवस्था का ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नवगिरे यांनी केली आहे. निवेदनावर विनाश साळुंके, हरी जाधव, अतुल जाधव व इतर पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे़