शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

राष्ट्रीय महामार्ग पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात

By admin | Updated: October 26, 2014 23:39 IST

सोमनाथ खताळ , बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. या अतिक्रमणामुळे महामार्ग अरूंद झाला असून वाहतूक कोंडी होत आहे.

सोमनाथ खताळ , बीडशहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. या अतिक्रमणामुळे महामार्ग अरूंद झाला असून वाहतूक कोंडी होत आहे. महिनाभरापूर्वीच हे अतिक्रमणे हटविण्यात आले होते, मात्र पालिकेने केलेल्या हा कारवाईचा बार फुसकाच ठरल्याचे दिसून येत आहे. अतिक्रमणधारकांनी नगर पालिका, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकावर टिच्चून शहरात अतिक्रमणे केले आहेत. यामुळे अपघातासही निमंत्रण मिळत आहे.बीड शहरातून सोलापूर-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग जातो. येथून दररोज हजारो वाहनांची वाहतूक असते. यामध्ये अवजड वाहनांसह छोट्या-मोठ्या वाहनांचाही समावेश असतो. शहराला बायपास नसल्याने अवजड वाहनांची वाहतूक ही शहराच्या मध्यातूनच होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे यापूर्वी अनेकांचे बळी गेलेले आहेत. एवढे प्रकार घडूनही अद्याप ही अतिक्रमणे हटलेले नाहीत. त्यामुळे यानंतरही ही अपघाताची मालिका चालूच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे अतिक्रमण हटवून महामार्ग मोकळा करावा, अशी मागणी वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.पोलीस घेतात बघ्याची भूमिकाशहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. या पोलिसांसमोरच अतिक्रमणे केलेली असतात. हिच अतिक्रमणे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असतानाही ते हटविण्यास कोणीही पुढे येत नाहीत. या ठिकाणी वाढत असलेले अतिक्रमणे पाहता पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेतात, त्यामुळे पोलिसांनीही यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.कडक कारवाईची आवश्यकताराष्ट्रीय महामार्गावरील तसेच इतर ठिकाणी जी अतिक्रमणे थाटली आहेत, अशा अतिक्रमणधारकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या अतिक्रमणधारकांना अनेकवेळा संबंधित विभागाकडून केवळ नोटिसा पाठविल्या जातात, मात्र कडक कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोधैर्य आणखीनच वाढत जाते. या अतिक्रमणांवर कायमचा हातोडा फिरवून वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणीही वाहनधारकांमधून केली जात आहे.साठे चौकात होतो अधिक त्रासशहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून सुभाष रोडची ओळख आहे. या मार्केटमध्ये जाण्यासाठी साठे चौकातून जावे लागते. मात्र याठिकाणी छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमणे केल्यामुळे मोठी अडचण होते. अनेकांचे या ठिकाणी अवजड वाहनाखाली चिरडून बळीही गेलेले आहेत. या ठिकाणी वाहनधारकांना अधिक त्रास सहन करावा लागतो.अवैध वाहतूक करणारे वाहनेही करतात अडचणशहरातील अण्णा भाऊ साठे चौक, जालना रोड, बार्शी रोड, सरकारी दवाखाना परिसर, नगर रोड, शिवाजी चौक, बसस्थानक परिसर, नगर नाका या भागात मोठ्या प्रमाणात खाजगी वाहनधारक मोठ्या प्रमाणात क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी बसवून अवैध प्रवाशी वाहतूक करतात. ही वाहनेही वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण करीत आहेत. यांच्यावरही कारवाईची मागणी होत आहे. याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.