शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत १६ सप्टेंबरला बँकप्रमुखांची राष्ट्रीय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:02 IST

औरंगाबाद : प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा नवउद्योजकांना लाभ व्हावा, प्रधानमंत्री सुरक्षा योजना, जनधन योजना प्रभावी राबवावी, डिजिटल ट्रान्सफर कसे ...

औरंगाबाद : प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा नवउद्योजकांना लाभ व्हावा, प्रधानमंत्री सुरक्षा योजना, जनधन योजना प्रभावी राबवावी, डिजिटल ट्रान्सफर कसे करता येईल, यासह शेतकरी बँक कर्ज योजना या चार मुद्द्यांवर राष्ट्रीय पातळीवरील बँकप्रमुखांची बैठक १६ सप्टेंबरला औरंगाबादेतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होत आहे. दिवसभर चालणाऱ्या या बैठकीत डीएमआयसीत गुंतवणुकीच्या संधी आणि बँकांचे सहकार्य, यावरही सादरीकरण होणार असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांंनी सांगितले.

सोमवारी डॉ. कराड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या बैठका आजवर महानगरांत झाल्या आहेत. पहिल्यांदाच औरंगाबादमध्ये अशी बैठक होत आहे. ही शासकीय बैठक असून, यात देशातील नॅशनलाईज बँकांचे चेअरमन, कार्यकारी संचालकांना आमंत्रित केले आहे. देशाच्या अर्थ खात्याचे सचिव, अतिरिक्त सचिव, नाबार्डचे चेअरमन बैठकीला असतील. दिवसभर ही बैठक चालणार आहे.

या बैठकीचा औरंगाबादला काय फायदा होईल, यावर डॉ. कराड म्हणाले, डीएमआयसी पूर्णपणे तयार आहे. डीएमआयसीत येणाऱ्या उद्योगांना बँकांनी सहकार्य करावे, यासाठी ही बैठक आहे. शेतकऱ्यांना बँकांकडून मिळणाऱ्या वागणुकीबाबत चर्चा होईल काय, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नाबार्डला येथे बोलावले आहे. मार्च ते जूनमध्ये बँकांचे ट्रान्सफर होतात. शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे याच काळात असतात. त्यामुळे बँक सुविधा, बदल्या याबाबत निर्णय होणारच आहेत. ४१ कोटी ७० लाख खाती देशभराच्या बँकेत असून, ८७ कोटी खातेधारक हे १८ वर्षांपुढील आहेत. तसेच प्रधानमंत्र्यांच्या नावाने ज्या योजना आहेत, त्याचे महत्त्व राष्टीयीकृत बँकांमध्ये आहे, खासगी बँकांमध्ये नाही. सामान्यांसाठी असलेल्या योजनांचा किती फायदा झाला, याची चर्चा बैठकीत होऊ शकते. त्यात मुद्रालोन, हॉकर्स योजना, शेतकरी कर्ज मुद्द्यांवर माहिती समोर येऊ शकते, असेही डॉ. कराड यांनी स्पष्ट केले.

डीएमआयसीतील गुंतवणुकीबाबत सादरीकरण

औरंगाबादच्या डीएमआयसीत उद्योग व्हावे, यासाठी बँकांच्या चेअरमनला माहिती असावी, यासाठी डीएमआयसीचे राष्ट्रीय संचालक अभिषेक चौधरी यांना बोलविले आहे. त्यांच्या उपस्थितीत डीएमआयसीत असलेल्या संधीचे सादरीकरण करता येईल. नीती आयोगाचे कार्यकारी संचालक हे देखील बैठकीत सहभागी होतील. औरंगाबादमधील उद्योजक, काही बँकर्स यांच्यात एका चर्चासत्राचे नियोजन सुरू आहे. यातून राष्ट्रीय पातळीवरील निर्णय असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा करून या बैठकीची फलनिष्पत्ती समोर आणली जाईल. युनियन बँकेचे चेअरमन, बँक ऑफ महाराष्ट्राचे चेअरमन, स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन येथे येणार आहेत.