शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक कंपनीला नारेगावात आग

By admin | Updated: July 2, 2014 01:01 IST

औरंगाबाद : नारेगाव परिसरातील गट नं. ३ मध्ये असलेल्या राजकमल एंटरप्रायजेस या प्लास्टिकचे दाणे उत्पादन करणाऱ्या कंपनीला मंगळवारी पहाटे अचानक आग लागली.

औरंगाबाद : नारेगाव परिसरातील गट नं. ३ मध्ये असलेल्या राजकमल एंटरप्रायजेस या प्लास्टिकचे दाणे उत्पादन करणाऱ्या कंपनीला मंगळवारी पहाटे अचानक आग लागली. तब्बल ५ तासांच्या अथक परिश्रमांनंतर महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीमध्ये तीन वाहनांसह कंपनीचे सुमारे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात अग्निशामक दलाच्या सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, प्लास्टिकच्या भंगार मालापासून दाणे उत्पादन करणारी नारेगावमध्ये राजकमल एंटरप्रायजेस ही कंपनी आहे. या कंपनीत मंगळवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सकाळी वाहत असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे आग भडकली. आजूबाजूच्या कंपनीतील कामगार व व्यवस्थापनाने एमआयडीसी सिडको पोलीस व अग्निशामक दलास आगीची माहिती दिली. त्यानुसार चिकलठाणा अग्निशामक दलाचे प्रभारी एस.एम. शकील, कृष्णा होळंबे, अब्दुल अजीज, अशोक खोतकर, एम.के. झाडे, के.एस. भगत, आर.के. सुरे, के.पी. दांगडे, एस.वाय. घुगे आदी जवानांसह ४ बंब व ४ टँकर घटनास्थळी पोहोचले. कंपनी परिसरात सर्वत्र प्लास्टिकचे भंगार विखुरले असल्यामुळे चोहोबाजूंनी आग पसरली होती. त्यामुळे अग्निशामक दलाचे जवान ही आग शेजारच्या कंपनीपर्यंत पोहोचू नये म्हणून शर्थीचे प्रयत्न करीत होते. शेजारच्या कंपनीनेही स्वत:चे ६ टँकर अग्निशामक दलाच्या मदतीला दिले. आग विझविण्यासाठी जवानांना तब्बल २४ टँकर पाण्याचा मारा करावा लागला. आगीत प्लास्टिकचे भंगार, प्लायवूड, कंपनीत उत्पादित केलेले प्लास्टिकचे दाणे, मोठमोठ्या ५-६ मशिनरी, परिसरात उभा असलेला ट्रक (क्र. एमएच-०४- ९००९), छोटा हत्ती-लोडिंग रिक्षा (क्र. एमएच-४२ एसई- ६०८४) व बोलेरो (क्र. एमएच-०४ बीटी- ५६६७) जळून भस्मसात झाली. जवळपास ७० लाख रुपयांची हानी झाल्याचा दावा कंपनीचे मालक शेख नुरुलहक अब्दुल लतीफ (रा. माणिकनगर, नारेगाव) यांनी केला आहे. बांधलेला घोडा भाजलाराजकमल एंटरप्रायजेस कंपनीच्या आवारात बांधलेला घोडा आगीमध्ये भाजला. कंपनीचे मालक शेख नुरुलहक व काही कर्मचारी सकाळीच नमाज अदा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी कंपनीच्या आवारात घोडा बांधून ठेवला होता.कंपनीच्या संरक्षक भिंतीजवळच विद्युत डीपी असून आतमध्ये लागूनच मीटरची खोली आहे. या खोलीत शॉर्टसर्किट झाले आणि आगीचा भडका उडाला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे चटके लागत असल्यामुळे घोडा सुटकेसाठी धडपडत होता; पण त्याची सुटका करण्याची हिंमत कोणीच करू शकले नाही. अग्निशामक दलाचे जवान तेथे पोहोचले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम त्याची सुटका केली.