शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गुरूवारपासून नांदेड-मुंबई विमानसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:15 IST

केंद्र शासनाच्या उडान योजनेअंतर्गत घोषित करण्यात आलेल्या नांदेड-मुंबई या मार्गावरील विमानसेवेला १६ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: केंद्र शासनाच्या उडान योजनेअंतर्गत घोषित करण्यात आलेल्या नांदेड-मुंबई या मार्गावरील विमानसेवेला १६ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे़ नांदेड विमानतळाच्या रनवेच्या दुरूस्तीचे काम १३ नोव्हेंबर रोजी पूर्ण होण्याची अपेक्षा असून त्याबाबतचा अहवाल विमानतळ प्राधिकरणाकडे पाठविला जाणार आहे़ हा अहवाल प्राप्त होताच नांदेड-मुंबई या बहुप्रतिक्षित विमानसेवेला प्रारंभ होणार आहे़केंद्र शासनाने देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी परवडेल अशा दरात उडान योजनेतून विमानसेवा सुरू केली होती़ त्यात नांदेड येथून हैदराबाद आणि मुंबई शहरांसाठी दररोज विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता़ त्यातील नांदेड-हैदराबाद ही विमानसेवा सुरू झाली, मात्र नांदेडकरांना मुंबईला जाण्यासाठी सेवा हवी होती़ याबाबत अनेकदा काँग्रेसकडून प्रश्नही विचारण्यात आले होते़ खा़ अशोकराव चव्हाण यांनीही नांदेड-मुंबई मार्गावरील विमानसेवेचा केंद्राला विसर पडला की काय? असा सवालही केला होता़नांदेड विमानतळाच्या रनवेच्या दुरूस्तीचे काम आवश्यक असल्याने नांदेड-मुंबई विमानसेवेला उशीर झाल्याचे सांगण्यात येत होते़ मात्र नांदेड विमानतळाच्या रनवेच्या दुरूस्तीचे काम हाती घेऊन ते पूर्ण करण्यात आले आहे़ १३ नोव्हेंबर रोजी दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर १६ नोव्हेंबरपासून मुंबईहून दुपारी १२़४५ वाजता सुटणारे विमान दुपारी २ वाजून २० मिनिटांनी नांदेडमध्ये पोहोचेल़तर नांदेडहून सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी सुटणारे विमान मुंबईत दुपारी १२ वाजून १० मिनिटास पोहोचेल़ रनवेच्या दुरूस्ती कामासाठी बंद पडलेली नांदेड-हैदराबाद विमानसेवाही १६ नोव्हेंबरपासूनच सुरू होणार आहे़ हैदराबाद येथून सकाळी ९ वाजता निघणारे विमान सकाळी १० वाजता नांदेडात तर नांदेडहून दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी सुटणारे विमान दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी हैदराबाद येथे पोहोचणार आहे़ ट्रूजेट द्वारे ही सेवा चालविली जाणार आहे़उडान योजनेअंतर्गत नांदेड-हैदराबाद या मार्गावरील सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे़ आता नांदेड-मुंबई या मार्गावरील विमानसेवेला प्रारंभ होणार आहे़ नांदेड-मुंबई या दररोज उपलब्ध राहणाºया विमानसेवेला आता प्रवाशांचा कितपत प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष लागले आहे़ विशेष म्हणजे, यापूर्वी सुरू असलेली नांदेड-मुंबई विमानसेवा ही प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे बंद पडली होती, हे विशेष़