शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड-दिल्ली विमानाचा बसणार औरंगाबादला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:18 IST

एअर इंडिया लवकरच अमृतसर किंवा चंदीगडमार्गे नांदेड-दिल्ली ही विमानसेवा सुरूकरणार आहे. या विमानसेवेमुळे नांदेड विमानतळाचा औरंगाबादला आणखी एक फटका बसणार आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीसाठी ये-जा करणा-या विमान प्रवाशांमध्ये घट होण्याची चिंता व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एअर इंडिया लवकरच अमृतसर किंवा चंदीगडमार्गे नांदेड-दिल्ली ही विमानसेवा सुरूकरणार आहे. या विमानसेवेमुळे नांदेड विमानतळाचा औरंगाबादला आणखी एक फटका बसणार आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीसाठी ये-जा करणा-या विमान प्रवाशांमध्ये घट होण्याची चिंता व्यक्त होत आहे.लहान विमानतळ जोडण्यासाठी केंद्र शासनाने ‘उडान’ ही योजना सुरू केली़ यामध्ये राज्यातील सहा विमानतळांची निवड करण्यात आली होती़ त्यात नांदेडचाही समावेश आहे़ या योजनेतून सुरुवातीला नांदेड-हैदराबाद ही विमानसेवा सुरू झाली़ या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला़ नोव्हेंबरमध्ये नांदेड-मुंबई विमानसेवेला हिरवा कंदिल मिळाला़ त्यामुळे नांदेडवरून हैदराबाद आणि मुंबई जाणाºया प्रवाशांची गैरसोय दूर झाली. आता नांदेड-दिल्ली विमानसेवा सुरू होत आहे. नांदेड आणि आजूबाजूंच्या भागातील विमान प्रवाशांची सोय होत आहे; परंतु याचा थेट परिणाम औरंगाबादवर होत आहे.चिकलठाणा विमानतळावरून सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले आहे. यापूर्वी नांदेड-हैदराबाद विमानसेवा सुरू झाली, तसेच नांदेड-मुंबई विमानसेवाही सुरू आहे. यामुळे औरंगाबादेतील विमानसेवेला घरघर लागत आहे. विमानसेवेसाठी पूर्वी नांदेड येथील नागरिकांना औरंगाबादचा पर्याय होता; परंतु आता औरंगाबादऐवजी नांदेडवरूनच विमान उपलब्ध होत आहे. सध्या दिल्ली विमानसेवेसाठी लातूर, परभणी, नांदेड येथील प्रवाशांना औरंगाबादला यावे लागते; परंतु नांदेड येथून आगामी काही दिवसांत ही विमानसेवा सुरू होईल. त्यामुळे औरंगाबादला येण्याचा फेरा टळणार आहे; मात्र यामुळे औरंगाबादहून दिल्लीला जाणा-या प्रवाशांची संख्या कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.थोडा परिणामनांदेड-दिल्ली विमानसेवा कधीपासून सुरू होत आहे, हे अद्याप निश्चित झालेले नाही. या विमानसेवेचा थोडाफार परिणाम होऊ शकतो. नांदेडसह लातूर, परभणीहून येणारे प्रवासी नांदेडहूनच दिल्लीला जातील; परंतु औरंगाबादेतील विमानाला अधिक फरक पडणार नाही.-रमेश नंदे, स्टेशन मॅनेजर, एअर इंडिया