शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत व्यक्तीचे नाव मयताच्या यादीत

By admin | Updated: November 3, 2016 01:40 IST

लोहारा :तोरंबा ग्रामपंचायतीने ठराव घेऊन मयत नऊ व्यक्तींची यादी तहसील कार्यालयाला पाठविली. मात्र, यात एका जिवंत असलेल्या व्यक्तीच्या नावाचाही समावेश

लोहारा : शासनाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांमधून मयत, स्थलांतरित व बोगस नावाचा शोध घेवून कळविण्याच्या सुचना तहसील प्रशासनाने दिल्यानंतर तोरंबा ग्रामपंचायतीने ठराव घेऊन मयत नऊ व्यक्तींची यादी तहसील कार्यालयाला पाठविली. मात्र, यात एका जिवंत असलेल्या व्यक्तीच्या नावाचाही समावेश असल्याचा प्रकार बुधवारी समोर आला आहे. केंद्र व राज्य शासनाकडून वयोवृध्द , निराधार, विधवांना संजय गांधी निराधार योजना व इंदीरा गांधी निराधार योजनेतंर्गत मासिक वेतन दिले जाते. याचा त्या कुटूंबाला चांगला अधार असतो. मात्र, अनेकवेळा धनधागडे याचा फयदा घेतना दिसतात. तर खरोखर ज्यांना गरज आहे; ते मात्र या योजनेपासून वंचित राहतात. दरम्यान, शासनाच्या विविध योजनांमधून देण्यात येत असलेल्या वेतनासंदर्भात मयत, स्थलांतरित व बोगस नावांचा शोध घेवून कळविण्याच्या सूचना तहसील प्रशासनाने आॅगस्ट महिन्यात तलाठी व ग्रमासेवकांना बैठक घेवून दिल्या होत्या. या नुसार तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी अशा नावांचा शोध घेऊन नंतर या याद्यांचे १५ आॅगस्ट रोजीच्या ग्रामसभेत वाचन करण्यात आले व त्या तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या. दिवाळीनिमित्त या लाभार्थी वयोवृध्दांचे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन संबंधित बँकांत जमा झाल्यामुळे तालुक्यातील तोरंबा येथील किसन महादू कांबळे (वय ८७) हे धानुरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत ही रक्कम उचलण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांच्या खात्यावर पगार जमा झाली नसल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी तहसील कार्यालय गाठून याबाबत विचारणा केली. यावेळी तहसील कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या मयत लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव आल्याचे कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कांबळे यांना सांगितले. तसेच आता तुम्ही हयात असल्याचे प्रमाणपत्र आणा. त्यानंतरच तुमची पगार सुरू होईल, असेही संजय गांधी योजनेचे बी. बी. मठपती यांनी कांबळे यांना सूचविले. (वार्ताहर)