शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींचे नाव ऑनलाईन नसल्याने उमेदवारांचे टेंशन वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 16:25 IST

नामनिर्देशनपत्र २३ ते ३० डिसेंबरपर्यंत स्विकारण्याचा कालावधी आहे.

ठळक मुद्दे कन्नड तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींची नावे पोर्टलवर नाहीत

कन्नड :  तालुक्यातील ८३ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया बुधवार (दि २३) पासुन सुरु झाली आहे. मात्र तालुक्यातील कळंकी, अंबा, औराळा, तळणेर, वाकद, लामणगाव, माटेगाव, धामणी खुर्द व सायगव्हाण या ९ ग्रामपंचायतींची नावे अर्ज दाखल करण्याच्या पोर्टलमध्ये समाविष्ट नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ऑनलाईन नामनिर्देशनपत्र दाखल करुन ऑनलाईन केलेली कागदपत्रे व अनामत रक्कम संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करावी लागते. बुधवारी संकेतस्थळ बंद होते. गुरुवारी संकेतस्थळ सुरु झाले. त्यावेळी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी गेलेल्या कळंकी, अंबा, औराळा, तळणेर, वाकद, लामणगाव, माटेगाव, धामणी खुर्द व सायगव्हाण येथील इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठीच्या ऑनलाईन पोर्टलवर आपल्या ग्रामपंचायतचे नावच नसल्याचे पाहून धक्काच बसला. उमेदवारांनी तात्काळ तालुकानिवडणुक अधिकारी तथा तहसिलदार संजय वारकड यांना हा प्रकार निदर्शनास आणून दिला.

वेळ आणि पैसा वाया जात आहे ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना १५ डिसेंबरलाच जारी झाली आहे. नामनिर्देशनपत्र २३ ते ३० डिसेंबरपर्यंत स्विकारण्याचा कालावधी आहे. त्यातही तीन दिवस सुट्या आहेत. गावाचे नावच नसल्याने नामनिर्देशनपत्र कसे दाखल करावे असा प्रश्न आहे. आमचा वेळ आणि पैसा खर्च होत आहे असे कळंकी येथील माजी उपसरपंच भाऊसाहेब साळूंके यांनी सांगितले.

तांत्रिक अडचण आहेही एक तांत्रिक अडचण असून दुरुस्तीचे काम सुरु आहे. तीन दिवस सुट्या असल्या तरी उमेदवार ऑनलाईन फॉर्म भरू शकतील अशी माहिती तालुका निवडणुक अधिकारी तथा तहसिलदार संजय वारकड यांनी सांगितली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत