शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या निर्घृण खुनाचे रहस्य उलगडले

By admin | Updated: September 15, 2015 00:34 IST

वाळूज महानगर : पंढरपुरातील २० वर्षीय युवकाच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात एमआयडीसी वाळूज पोलिसांना यश आले असून,

वाळूज महानगर : पंढरपुरातील २० वर्षीय युवकाच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात एमआयडीसी वाळूज पोलिसांना यश आले असून, खून करून फरार झालेल्या आरोपींना रविवारी रात्री पोलिसांनी अमरावती जिल्ह्यात अटक केली. अवघ्या २४ तासांत मारेकऱ्यांचा शोध लागल्यामुळे पोलीस प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.वाळूज औद्योगिक परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून खुनाच्या घटना घडत असून, आतापर्यंत तिघांचा बळी गेला आहे. क्षुल्लक कारणावरून हे सर्व खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पंढरपुरातील देवगिरी बँकेच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत दीपक अशोक बनकर (२०, रा. सलामपुरेनगर, पंढरपूर) या युवकाचा दगड व हत्याराने खून करून मारेकरी फरार झाले होते. दरम्यान, मयत दीपक घटनेच्या काही वेळ आधी पंढरपुरात त्याच्या मित्रांसमवेत गप्पा मारत होता, अशी माहिती दीपकचा भाऊ विजय याने पोलिसांना दिली होती. घटनेनंतर त्याचे मित्र गायब झाल्यामुळे त्यांनी खून केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला होता. प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्यामुळे आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पोलीस पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली होती.वडनेरा रेल्वेस्थानकावर आरोपी जेरबंददीपकचा खून करून आरोपी त्यांच्या मूळ गावी अमरावतीकडे पसार झाल्याची माहिती मिळाल्यामुळे त्यांच्या शोधासाठी एमआयडीसी वाळूज ठाण्याचे पथक अमरावती जिल्ह्याकडे रवाना झाले होते. संशयितांची नावे पोलिसांना मिळाल्यामुळे पोलीस पथकाने रात्री अमरावती जिल्ह्यातील वडनेरा रेल्वेस्थानकावर आरोपी आकाश परतेक (२५, रा. परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती, ह.मु. बकवालनगर) व सागर उइके (१९, रा. परतवाडा, जि. अमरावती, ह.मु. साईश्री कंपनी, वाळूज एमआयडीसी) यांना शिताफीने अटक केली. या आरोपींनी दीपकचा भांडणातून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली असून, या दोघा आरोपींना ताब्यात घेऊन सोमवारी सकाळी पोलीस पथक वाळूज औद्योगिक परिसरात परतले. या पथकात पोहेकॉ. परमेश्वर पायगव्हाणे, पोकॉ. बाबासाहेब काकडे, पोकॉ. किशोर काळे आदींचा समावेश होता.क्षुल्लक भांडणातून झाला खूनदीपक, आकाश व सागर हे मित्र शनिवारी पोळ्याच्या दिवशी पंढरपुरात गप्पा मारत बसले होते. रात्री ते देवगिरी बँकेसमोरील उघड्या मैदानाजवळ गेले. या ठिकाणी तिघांमध्ये बाचाबाची सुरू झाल्यावर दीपक याने आकाशला थप्पड मारली. यामुळे संतप्त झालेल्या आकाश व सागर यांनी दीपक यास मारहाण करीत दोघांनी दोन दगड त्याच्या डोक्यात टाकले व ते पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या दीपक यास वेळीच उपचार न मिळाल्यामुळे तसेच खूप रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दोन्ही आरोपींनी दीपकचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. अवघ्या २४ तासांत या खुनाचे रहस्य उलगडण्यात एमआयडीसी वाळूज पोलिसांना यश आले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार एम.बी. टाक करीत आहेत.