शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

‘माझा विठ्ठल’ चित्रप्रदर्शनाला चित्रपे्रमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:27 IST

विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारलेली ‘विठुमाऊली’ची विविध रूपे पाहण्यासाठी शहरातील चित्रपे्रमींनी आणि विद्यार्थ्यांनी रविवारी प्रोझोन मॉल येथे एकच गर्दी केली होती. ‘लोकमत’ आणि ‘स्टार प्रवाह’ यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘माझा विठ्ठल’ या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारलेली ‘विठुमाऊली’ची विविध रूपे पाहण्यासाठी शहरातील चित्रपे्रमींनी आणि विद्यार्थ्यांनी रविवारी प्रोझोन मॉल येथे एकच गर्दी केली होती. ‘लोकमत’ आणि ‘स्टार प्रवाह’ यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘माझा विठ्ठल’ या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील निवडक चित्रे प्रोझोन येथील प्रदर्शनात पाहायला मिळाली.राजा रवी वर्मा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. उदय भोईर, मेसमराईज गॅलरीचे संचालक दीपक देशमुख, रोहित क्रिएटिव्ह क्लासेसचे संचालक रोहित गिरी, हर्ष आर्ट क्रिएशनचे संचालक हरीश दहीहंडे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला आणि कलात्मकतेला वाव देण्याचा उत्तम प्रयत्न करण्यात आला.महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलावर आधारित ‘विठुमाऊली’ ही नवी मालिका स्टार प्रवाहवर दि. ३० आॅक्टोबरपासून सायं. ७ वा. प्रसारित होणार आहे. भव्य-दिव्य अशी निर्मिती असलेली ही मालिका महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांच्या कोठारे व्हिजन या निर्मिती संस्थेने तयार केली आहे. या मालिकेच्या निमित्ताने ‘माझा विठ्ठल’ ही अनोखी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. शहरातील हजारो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या चित्रांतून रंगांची मुक्तहस्ताने उधळण करीत विठ्ठलाची अनेकविध रूपेचितारली.विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ देण्यासाठीच या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी आणि चित्रप्रेमींनी प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट दिली. ‘माझा विठ्ठल’ स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा दि. ३० आॅक्टोबर रोजी सायं. ७ वा. स्टार प्रवाहवर ‘विठुमाऊली’ या मालिकेच्या पहिल्या भागात केली जाणार आहे.