शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:34 IST

जीवनातील गरजा पूर्ण करण्यासह निवृत्तीनंतर आरामदायी आयुष्य जगण्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सर्वात योग्य पर्याय असल्याचे गुंतवणूक इच्छुकदारांनी मान्य केले. म्युच्युअल फंडात आजच गुंतवणूक करण्याचा निर्धारही सर्वांनी केला.

ठळक मुद्देउदंड प्रतिसाद : लोकमत आणि आदित्य बिर्ला सनलाईफतर्फे मार्गदर्शन शिबीर

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जीवनातील गरजा पूर्ण करण्यासह निवृत्तीनंतर आरामदायी आयुष्य जगण्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सर्वात योग्य पर्याय असल्याचे गुंतवणूक इच्छुकदारांनी मान्य केले. म्युच्युअल फंडात आजच गुंतवणूक करण्याचा निर्धारही सर्वांनी केला.प्रसंग होता, ‘लोकमत’ आणि ‘आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड’ यांच्यातर्फे बुधवारी आयोजित विशेष मार्गदर्शन शिबिराचे. म्युच्युअल फंडविषयी अधिकची माहिती जाणून घेण्यास शहरवासीयांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याची प्रचीती यानिमित्ताने आली. रेल्वेस्टेशन रोडवरील व्हिटस् हॉटेलमधील हॉल संपूर्ण भरला होता. जागा न मिळाल्याने तेवढेच लोक हॉलबाहेर उभे होते. यात कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या मनात आपल्या कमाईतील पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याची प्रबळ इच्छा होती. ही इच्छा शिबिरात अनेकांनी व्यक्त करून दाखविली. आदित्य बिर्ला सनलाईफ मालमत्ता व्यवस्थापनाचे प्रादेशिक प्रमुख प्रशांत गुप्ता यांनी सांगितले की, आपण कमावलेल्या पै-पै पैशाची कोणाच्या सांगण्यावर किंवा अर्धवट माहितीवर डोळे झाकून कुठेही गुंतवणूक करूनका. गुंतवणूक करण्यापूर्वी आपण आपल्या जीवनातील गरजा ओळखा, त्यात प्राथमिकतेनुसार त्या गरजांची गटवारी तयार करा. त्यानुसार आर्थिक नियोजन करा. गुंतवणुकीची सुरुवात लवकर करा. जेवढे लवकर तुम्ही गुंतवणूक कराल तेवढा फायदा तुम्हाला मिळेल. सध्या नोकरीचा काही भरोसा राहिलेला नाही. तसेच आता खाजगी क्षेत्रात सोडाच पण सरकारी नोकरीतही निवृत्तीवेतन मिळणार नाही. यामुळे निवृत्तीनंतरच्या आयुष्यात पैशाची टंचाई जाणवू द्यायची नसेल, तर ‘म्युच्युअल फंड’ शिवाय दुसरा सर्वोत्तम पर्याय नाही. हे त्यांनी ‘विविध व्हिडिओ क्लिप’ व उदाहरणाद्वारे उपस्थितांना पटवून दिले. ‘म्युच्युअल फंड’ म्हणजे काय आहे. मागील २० वर्षांत यात गुंतवणूक करणाºयांना किती लाभ झाला याची सविस्तर माहिती प्रशिक्षक नीलरत्न चौबळ यांनी दिली. त्यांनी सांगितले की, गुंतवणूक करताना तुम्हाला जोखीम घ्यावीच लागेल. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे हे जोखमीचे आहे, असे स्पष्ट सांगितल्या जाते हेच यातील ‘पारदर्शकता’ असल्याचे त्यांनी नमूद केले. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे विकेंद्रीकरण करू शकता. शिवाय जोखीमदेखील थोडी कमी होते याची सविस्तर माहिती त्यांनी दिली.म्युच्युअल फंडात गुंतवणूक वैविध्यपूर्ण४म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक ही अनेक जागी केल्या जाते. म्हणून गुंतवणूक ही वैविध्यपूर्ण असते. त्यामुळे धोका कमी होतो. समजा तुमची पूर्ण गुंतवणूक एकाच प्लॉटमध्ये आहे. किंवा एकाच कंपनीच्या शेअरमध्ये आहे. फक्त सोन्यातच आहे, अशा वेळेस किमती कमी झाल्यास मोठे नुकसान होते. या उलट जर तुमची गुंतवणूक वैविध्यपूर्ण असेल आणि एका गुंतवणुकीवर संकट आले, तर तुमचे जास्त नुकसान होणार नाही. झालेले नुकसान दुसरी गुंतवणूक भरूनही काढू शकते. हेच म्युच्युअल फंडचे वैशिष्ट्य असल्याचे प्रशांत गुप्ता यांनी सांगितले.