शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मुथुट फायनान्सवर दरोडा टाकणारी टोळी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:43 IST

दूध डेअरी चौकातील मुथुट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर भरदिवसा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाºया टोळीला हैदराबाद पोलिसांनी अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दूध डेअरी चौकातील मुथुट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर भरदिवसा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाºया टोळीला हैदराबाद पोलिसांनी अटक केली. हे आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, त्यांना लवकरच औरंगाबाद पोलिसांकडून अटक केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी २४ आॅगस्ट रोजी पत्रकारांना दिली.१४ मे २०१६ रोजी सकाळी ९.४० वाजेच्या सुमारास पोलिसांच्या वेशात पाच ते सहा दरोडेखोरांनी या फायनान्स कंपनीवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी कार्यालयीन कर्मचाºयांनी प्रसंगावधान राखून अलार्म वाजविल्याने घाबरलेले दरोडेखोर वाहनांनी पळून गेले होते. तेव्हापासून पोलीस यंत्रणा दरोडेखोरांच्या मागावर होती. दरोडेखोरांनी गुन्ह्यात वापरलेली कार चोरीची निघाली होती. आंतरराज्यीय दरोडेखोरांची ही टोळी असल्याने ते सारखे एका राज्यातून दुसºया राज्यात प्रवास करीत. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी येथे रुजू झाल्यानंतर या दरोड्याच्या तपासाची प्रगती जाणून घेऊन हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी अधिकाºयांना मार्गदर्शन केले होते. पोलिसांचा तपास सुरू असतानाच हैदराबाद पोलिसांनी पकडलेल्या दरोडेखोरांच्या टोळीने औरंगाबादेतील मुथुट फायनान्सवर दरोडा टाकल्याची कबुली दिली. याबाबतची आयुक्तांना नुकतीच माहिती मिळाली आहे.याविषयी आयुक्त यादव म्हणाले की, सध्या ही टोळी हैदराबाद पोलिसांच्या कोठडीत आहे. त्यांची रिमांड संपल्यानंतर औरंगाबाद पोलीस आरोपींना ताब्यात घेऊन औरंगाबादेत आणतील.