शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मस्टरवर तीनशे मजूर, कामावर एकही नाही

By admin | Updated: May 18, 2017 23:16 IST

बीड :मस्टरवर तीनशे मजुरांची नोंद असताना प्रत्यक्षात कामावर मात्र एकही मजूर उपस्थित नव्हता. बीड तालुक्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : विकासकामांसोबत मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून सुरु केलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत कागदोपत्री मजूर दाखवून शासन निधी कसा लाटला जातो हे अधिकाऱ्यांनी केलेल्या ‘सरप्राईज व्हिजिट’मध्येच बुधवारी उघडकीस आले. मस्टरवर तीनशे मजुरांची नोंद असताना प्रत्यक्षात कामावर मात्र एकही मजूर उपस्थित नव्हता. बीड तालुक्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला असून रोहयो गावपुढाऱ्यांसाठी कुरण बनल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्हा परिषदेच्या रोहयो कक्षाचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी कृषी अधिकारी, तांत्रिक अधिकाऱ्यांसमवेत बीड तालुक्यातील नेकनूर, भंडारवाडी व कळसंबर या तीन गावांत सुरु असलेल्या रोहयो कामांना बुधवारी भेट दिली. मस्टरवर शेकडो मजूर कामावर असल्याची नोंद असताना प्रत्यक्षात बोटावर मोजण्याएवढेच मजूर दिसून आले. कळसंबर येथे तर एकही मजूर कामाच्या ठिकाणी हजर नव्हता. भागवत यांनी गटविकास अधिकारी रवींद्र तुरुकमारे यांना तपासणी अहवाल पाठवून यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रोहयो कामांत कागदी घोडे नाचविणाऱ्यांवर पंचायत समिती प्रशासन कुठली कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीडीओ आजारी रजेवरबीड पं.स.चे गटविकास अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मोकाटे हे आजारी रजेवर गेले आहेत. त्यांनी कठोर भूमिका घेतल्याने त्यांना रजा देण्यास भाग पाडल्याची चर्चा आहे.