औरंगाबाद : महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांना १० टक्के आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. राज्यातील तमाम मुस्लिमांनी या मागणीसाठी रस्त्यावर येण्यास काहीच हरकत नाही. सोमवारी आपण राज्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांना एका अराजकीय व्यासपीठावर आमंत्रित केले आहे. या बैठकीत आरक्षणावर सखोल चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती समाजवादी पक्षाचे नेते तथा आ. अबू असीम आझमी यांनी येथे दिली.पत्रकार परिषदेत आझमी म्हणाले की, आपल्या हक्कासाठी मुस्लिमांनाही रस्त्यावर उतरावेच लागेल. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन लढा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष सत्तेवर आहे. तेथे मुस्लिमांना आरक्षण देण्याची घोषणा आपल्याच पक्षाने केली होती. आजपर्यंत ही मागणी पूर्ण केलेली नाही. या प्रश्नावर संतप्त झालेले आझमी यांनी आरक्षणाच्या मुद्यावर अधिक बोलण्याचे टाळले. मी महाराष्ट्रात समाजवादी पक्षाचे राजकारण करतो, आपण येथील मुद्यावर बोला असेही आझमी यांनी नमूद केले. एमआयएमवर टीका‘एमआयएम’या पक्षाबद्दल पत्रकारांनी आझमी यांना छेडले असता त्यांनी हा पक्ष फक्त सेटलमेंट करणारा आहे. औरंगाबाद महापालिकेत या पक्षाचे २५ नगरसेवक निवडून आले. काय केले काहीच नाही. पक्षाचे नेते रात्री अमित शहा यांच्याकडून भाषण लिहून घेतात आणि वाचून दाखवतात.
आरक्षणासाठी मुस्लिमांनी आता रस्त्यावर यावे
By admin | Updated: September 26, 2016 00:39 IST