शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम समाज करणार 'किसानबाग' आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:02 IST

औरंगाबाद : येत्या २७ जानेवारी रोजी शाहीनबागच्या धर्तीवर मुस्लिम समाज किसानबाग आंदोलन करून कृषी कायद्यांच्या निषेधार्थ सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या ...

औरंगाबाद : येत्या २७ जानेवारी रोजी शाहीनबागच्या धर्तीवर मुस्लिम समाज किसानबाग आंदोलन करून कृषी कायद्यांच्या निषेधार्थ सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देणार आहे. यादिवशी मुस्लिम समाज तालुका, जिल्हा व शहर पातळीवर संविधानाची प्रत हातात घेऊन दिवसभर धरणे आंदोलन करेल, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

या आंदोलनामुळे आरएसएस-भाजपच्या जातीयवादी राजकारणाला शह मिळेल व समूहाच्या प्रश्नांना महत्त्व देणारे राजकारण सुरू होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

त्यांनी सांगितले की, मुंबईत आंबेडकर भवनात झालेल्या मुस्लिम अलीम, मौलाना व विचारवंतांच्या बैठकीत किसानबाग आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सीएए-एनआरसी विरोधी आंदोलनाच्या वेळी केंद्र सरकारने सत्तेचा दुरुपयोग करीत दिल्लीतील शाहीनबाग आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पंजाबच्या शेतकऱ्यांनी शाहीनबागेत येऊन लंगर व आंदोलकांच्या समर्थनाचे औदार्य दाखविले होते. आता पंजाबमधील शेतकऱ्यांशी एकरूपता व सहानुभूती दाखवत मुस्लिम समाजाने किसानबाग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात मुस्लिम समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनात काँग्रेस व डावे पक्ष दिसत नाहीत. त्यांना काय लकवा मारलाय का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

रामदास आठवले म्हणतात, तुम्ही रिपब्लिकन राहिले नाही. जोगेंद्र कवाडे म्हणतात, तुमचा पक्ष संधीसाधू लोकांचा ठिसूळ पक्ष आहे. याकडे लक्ष वेधले असता बाळासाहेब उत्तरले, त्यांना काय वाटते ते वाटू द्या. आम्ही कुणाच्या दारात कटोरा घेऊन तर उभे नाही. याचा आम्हाला अभिमान आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आम्ही पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर लढू, असे त्यांनी जाहीर केले. फारुख अहमद, सिद्धार्थ मोकळे, अमित भुईगळ, प्रभाकर बकले, योगेश बन, संदीप शिरसाठ, लता बामणे, वंदना नरवडे, कांचन सदाशिवे, माणिक करवंजे, आदींसह मुस्लिम व शीख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.