परळी : तालुक्यातील सेलू येथील तरुणाच्या खूनाचे रहस्य ४८ तास उलटूनही उलगडलेले नाही. मयतावर चोऱ्या, दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांपुढे तपासाचे आव्हान आहे.सेलू येथील आकाश हनुमंत काळे (२०) याचा मृतदेह घराजवळ आढळला होता. त्याच्याच छातीत खोल घाव असून ग्रामीण ठाण्यात अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. खुनाचे धोगेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्याला कोणी व कशासाठी संपविले? याचे रहस्य कायम असल्याने तपासाकडे गावकऱ्यांचेही लक्ष आहे. सहायक निरीक्षक बी. बी. नाईकवाडे म्हणाले, सर्व बाजूंनी तपास सुरु आहे. नातेवाईकांचे जवाब नोंदविल्यावर काही बाबी स्पष्ट होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)
तरुणाच्या खुनाचे गूढ कायम
By admin | Updated: October 12, 2016 23:09 IST