शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गट्टूने ठेचून अनोळखी तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:02 IST

नवा मोंढा, जाधववाडी येथील जनरल व्यापारी संकुलाच्या छतावर नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास काही लोक लघुशंका करण्यासाठी ...

नवा मोंढा, जाधववाडी येथील जनरल व्यापारी संकुलाच्या छतावर नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास काही लोक लघुशंका करण्यासाठी गेले. तेव्हा तेथे अनोळखी व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेली दिसली. हे दृश्य पाहून तीन ते चार जण दूरवरच उभे राहिले. सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या कंपनीचे कार्यालय तेथेच असल्यामुळे सुपरवायझर दिलीप सुरेश बोर्डे हे त्या लोकांना हाकलण्यासाठी तेथे गेले असता त्यांना हा खुनाचा प्रकार असल्याचे दिसले. त्यांनी लगेच पोलीस उपनिरीक्षक एकनाथ इंगळे यांना ही घटना कळविली. इंगळे यांनी सिडको पोलीस ठाण्याला याविषयी माहिती दिली. यानंतर पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक सुनील अरबाड, फौजदार बाळासाहेब आहेर आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

===============

मयत आणि आरोपी ओळखीचे

मारेकऱ्यांनी काहीतरी वादातून या व्यक्तीचा सिमेंट गट्टूने डोके ठेचून खून केल्याचे दिसून आले. सिमेंट गट्टूच्या ठिकऱ्या झाल्याचे दिसून आले. आरोपी आणि मयत हे परस्परांच्या ओळखीचे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. गांजाच्या गोळ्या, पाण्याची बाटली तेथे आढळून आली. कदाचित नशापाणी करण्यावरून झालेल्या वादात हा खून करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. मयताची ओळख पटलेली नाही.

===============

हमाल, मजूर असण्याची शक्यता

खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यासारखे ओळखपत्र अथवा कागदपत्रे घटनास्थळी आढळून आली नाहीत. मयताच्या अंगावर काळी पँट, चॉकलेटी फुलांचा शर्ट, बनियन आणि अंडरपँट होती. याशिवाय मृतदेहाशेजारीच रुमालात बांधलेला गाठोड्यात शर्ट-पँट आणि अंडरपँट बनियन होती. मृतदेहाच्या उशाजवळ चिल्लर पाच ते सात नाणी आणि दोन गांजाच्या गोळ्या पडलेल्या होत्या.

=====================

खिचडीचे पार्सल तसेच पडून

खून झालेल्या व्यक्तीजवळ खिचडीचे पार्सल जसेच्या तसे होते. यावरून मयताने स्वतःसाठी हे पार्सल रात्री बाजार समितीमधील एका हॉटेलमधून आणले असावे. मात्र, ही खिचडी त्याने खाल्लेली दिसत नाही.

==========

फॉरेन्सिक पथकाने गोळा केले काही नमुने

घटना समोर आल्यावर न्याय सहायक प्रयोगशाळेच्या पथकाला तेथे पाचारण करण्यात आले. पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरील रक्ताचे नमुने, काही केस आणि अन्य वस्तू जप्त केल्या.