औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून हुसैन हा आजारी असल्याने त्याच्याकडून दररोज काम होत नव्हते. त्यामुळे घरात आर्थिक चणचण भासू लागली होती. त्यामुळे या पती- पत्नीत अधिकच खटके उडू लागले होते. काल दुपारी आई- वडिलांचा विषय निघाल्यानंतर शमिनाने हुसैनसोबत पुन्हा वाद घातला. लग्न झाले तेव्हाच तुमचे आई-वडील माझ्यासाठी मेले, अशा शब्दांत तिने हुसैनला झिडकारले. त्यामुळे सतत किरकिर करणाऱ्या पत्नीची किरकिर आज कायमचीच मिटवून टाकू, असा विचार हुसैनने केला. रात्री नित्याप्रमाणे पत्नी तीन मुलांसह घरात झोपी गेली. तेव्हा हुसैननेही त्यांच्या सोबत झोपेचे नाटक केले. शमिना आणि मुले गाढ झोपी गेल्याचे लक्षात आल्यानंतर मध्यरात्री तो उठला. त्याने एक मोठा दगड आणला आणि शमिनाच्या डोक्यात टाकला. क्षणातच तिचा जीव गेला. आरडाओरड झाल्यानंतर सिडको एमआयडीसी ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी शमिनाचे प्रेत शवविच्छेदनासाठी घाटीत पाठविले. नंतर अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला; परंतु घटनास्थळाची एकंदरीत परिस्थिती पाहिल्यानंतर हा खून हुसैननेच केल्याचे दिसत होते. त्यामुळे संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ‘खाक्या’ दाखविताच अखेर हुसैनने खुनाची कबुली दिली.म्हणे... चोरांनी मारलेपत्नीचा खून केल्यानंतर आता आपण पकडले जाऊ, काय करावे, असा प्रश्न हुसैनसमोर उभा राहिला. तेव्हा स्वत:चा बचाव करण्यासाठी हुसैनने पावणेदोन वाजेच्या सुमारास ‘चोर... चोर...’ अशी आरडाओरड सुरू केली. आवाज ऐकून शेजारीपाजारी धावत आले. तेव्हा घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली शमिनाबी नजरेस पडली.बाजूलाच तिची मुले झोपलेली होती. ‘घरात दोन चोर आले होते. त्यांनी चोरी करताना शमिनाच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला,’ अशी खोटी कथा हुसैनने शेजाऱ्यांना सांगितली. पोलीस आल्यानंतरही त्याने असेच सांगितले; परंतु घटनास्थळाची परिस्थिती पाहिल्यानंतर हा खून हुसैनने केल्याचे आणि आता तो चोर आल्याचा बनाव करीत असल्याचे स्पष्ट झाले.
कुरबुरीला वैतागून केला खून; आरोपी अटकेत
By admin | Updated: August 23, 2014 00:49 IST