शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील साकोळ येथील माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष लुल्ले (वय ४०) यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ही घटना १५ मे रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून, याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर १३ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. साकोळ येथील तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष संतोष लुल्ले यांच्यासोबत मागील भांडणाची कुरापत काढून काही जणांनी तलवार, कुºहाड, कोयते, लोखंडी रॉड आदी तीक्ष्ण हत्याराने वार केले. अंगावर तलवार, कुºहाड, कोयत्याचे मोठ्या प्रमाणात घाव होते़ गंभीर जमखी झालेल्या संतोष लुल्ले यांना लातूरच्या शासकीय सर्वोपचार रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र उपचार सुरू असताना संतोष लुल्ले यांचा मृत्यू झाला़ याप्रकरणी मयत संतोष लुल्ले यांचे वडील बाबूराव आप्पाराव लुल्ले यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून राजकुमार घुगे-पाटील, महेश लुल्ले, आशिष धुमाळे, महेश कवठाळे, भीमाशंकर लखमशेट्टे, भानकोजी लुल्ले, बाळू धुमाळे, मल्लिकार्जुन मुळगे, रमेश लुल्ले, उमाकांत कवठाळे, योगेश दामा, पांडू अहंकारी यांच्याविरुद्ध गु.र.नं. ३४/२०१४ कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली शिंदे करीत आहेत.(वार्ताहर) या खून प्रकरणात शिरूर अनंतपाळ पोलिसात १३ जणांवर गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले नाहीत़ जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या या घटनेची साकोळ परिसरात चर्चा रंगली आहे़ घटना घडून दोन दिवस लोटले तरी अद्यापही पोलिसांना आरोपीचा शोध लागला नाही़ पोलिस आरोपीच्या शोधात असल्याचे शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले़
तंटामुक्ती समितीच्या माजी अध्यक्षाचा खून
By admin | Updated: May 18, 2014 00:48 IST