लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नगर पालिकेतील कर्मचारी लेखापाल गणेश पगारे व अनुरेखक सलीम यांच्या विरोधात असलेल्या चौकशी अहवालावर १५ वर्षांपासून कारवाई झाली नाही. चौकशीत दोषी आढळल्यावर कारवाईसाठी विशेष सभेत चर्चा व निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी बांधकाम सभापती अमर नाईकवाडे व इतर नगरसेवकांनी नगराध्यक्षांकडे केली होती. परंतु त्यांनी दखल न घेतल्याने जिल्हाधिकाºयांकडे मागणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी १ आॅगस्ट रोजी बीड न.प.ची विशेष सभा बोलावली आहे. दरम्यान, नाईकवाडेंनी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या कारभारावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.सलीम या कर्मचाºयावर २००४-६ या वर्षात बोगस नाहरकत दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.यात निलंबन झाले होते. निलंबन काळात विभागीय चौकशी सुरु असताना पालिकेत कर्मचारी संख्या कमी असल्याचे दाखवत सलीम यांचा निलंबन काळ सेवाकाळ म्हणुन गृहीत धरत त्यांना सेवेत घेण्यात यावे, याचे स्वागत नाईकवाडे यांनी केले होते; मात्र सलीम याच कर्मचाºयाबाबत २००६ नंतर आलेल्या चौकशी अहवालात जेंव्हा हे कर्मचारी दोषी आढळतात तेव्हा घेतलेला ठराव रद्द करून चौकशी अहवालात दोेषी ठरवलेल्या सलीम व पगारे यांच्याविरूद्ध कारवाई तेव्हाचे व आताचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी का केली नाही, असा सवालही नाईकवाडे यांनी उपस्थित केला आहे. यासारख्या विविध मुद्यांना धरुनच डॉ. क्षीरसागर यांच्यावर विविध आरोप पत्रकाद्वारे करण्यात आले आहेत. आता १ आॅगस्टच्या विशेष सभेत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकाºयांनी बोलावली पालिकेची विशेष सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:26 IST