शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘अमंगल’ कामावर मनपाचा हातोडा

By admin | Updated: October 8, 2016 01:17 IST

औरंगाबाद : जाधववाडी चौकातील जायस्वाल मंगल कार्यालयावर शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता अचानक महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या जेसीबीने धडक दिली

औरंगाबाद : जाधववाडी चौकातील जायस्वाल मंगल कार्यालयावर शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता अचानक महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या जेसीबीने धडक दिली. अंडरग्राऊंडमधील १५ बाय ६० फुटांचे अतिक्रमण, पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. ही कारवाई थांबविण्यासाठी मनपातील सत्ताधाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, मनपा आयुक्तांनी राजकीय दबाव झुगारून मंगल कार्यालयाचे ‘अमंगल’ काम हटविले.विद्यानिकेतन सोसायटी एन-९ येथील चेअरमनला मनपाने २६ डिसेंबर २०१४ रोजी रामकृष्ण हॉस्पिटलच्या बाजूस बांधकाम परवानगी दिली. याठिकाणी जायस्वाल मंगल कार्यालय उभारण्यात आले. मनपाने दिलेल्या बांधकाम परवानगीशिवाय मालकाने साईड मार्जीनमध्ये तब्बल १५ बाय ६० फूट लांब अतिक्रमण केले. अंडरग्राऊंडमध्ये आठपेक्षा अधिक खोल्या उभारण्यात आल्या. या खोल्या तळमजल्यातील पार्किंगला जोडण्यात आल्या. मंगल कार्यालयाच्या बाजूला १५ मीटर रस्त्यावरून हे अतिक्रमण दिसतही नव्हते. कारण त्यावर सिमेंटचा स्लॅब आणि माती टाकण्यात आली होती. मंगल कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर २ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम करण्यात आले. दुसऱ्या मजल्यावर तीन अधिकृत खोल्या उभारण्यात आल्या.शुक्रवारी सकाळी मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सदरील अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपायुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता एस. एस. कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता कारभारी घुगे, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद यांनी मंगल कार्यालयाच्या दुसऱ्या आणि पहिल्या मजल्याचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. त्यानंतर मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने १५ मीटर रस्त्याच्या कडेला खड्डा करून जमिनीतील अतिक्रमण जमीनदोस्त केले. ही कारवाई थांबविण्यासाठी मनपातील सत्ताधारी मंडळींनी बरेच प्रयत्न केले. मात्र, आयुक्तांनी कारवाई पूर्ण केल्याशिवाय कोणीही जागेवरून हलणार नाही, असे आदेश दिले होते.