शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांनी पोसले गुत्तेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:06 IST

शासनाच्या विविध योजनांसाठी आपणच प्रयत्न केले. आपल्यामुळेच योजना कार्यान्वित झाली, असे म्हणून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. वास्तविक पाहता हे नगराध्यक्ष विविध कामांत अव्वाच्च सव्वा बिले लावून केवळ गुत्तेदार पोसण्याचे काम करीत असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष तथा नगराध्यक्षांचे पुतणे हेमंत क्षीरसागर यांनी केला.

ठळक मुद्देपत्रपरिषदेत काकांवर आरोपशासनाच्या योजनांचे श्रेय घेतले - हेमंत क्षीरसागर

बीड : शासनाच्या विविध योजनांसाठी आपणच प्रयत्न केले. आपल्यामुळेच योजना कार्यान्वित झाली, असे म्हणून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. वास्तविक पाहता हे नगराध्यक्ष विविध कामांत अव्वाच्च सव्वा बिले लावून केवळ गुत्तेदार पोसण्याचे काम करीत असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष तथा नगराध्यक्षांचे पुतणे हेमंत क्षीरसागर यांनी केला.

बीड नगर पालिकेत बुधवारी सायंकाळी काकु-नाना आघाडीचे उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, पाणीपुरवठा सभापती फारूक पटेल, बांधकाम सभापती अमर नाईकवाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्षांवर सडेतोड टिका करण्याबरोबच विविध योजना व रखडलेल्या टेंडरची माहिती दिली.

हेमंत क्षीरसागर म्हणाले, बीड शहरात सध्या आपण विविध योजना आणण्यसाठी प्रयत्न केले. आपल्यामुळेच उद्यान, स्वच्छता, पाणी पुरवठा, भुयारी गटार कार्यान्वीत होत आहेत. वास्तविक पाहता या सर्व योजना केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत झालेल्या आहेत. यासाठी सर्वांनीच परिश्रम घेतलेले आहेत. परंतु नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर आपणच हे सर्व केले असे म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. हे श्रेय घेण्याचे त्यांनी सोडून द्यावे. हे करण्यापेक्षा विकास कामांत लक्ष घातले तर शहर हरीत होईल, असे म्हणून हेमंत क्षीरसागर यांनी काकाला टोला लगावला. स्वच्छतेचे टेंडर पास करण्यासाठी नगराध्यक्षांनी रोगराई पसरण्याची वाट पाहिली, असा आरोपही हेमंत क्षीरसागर यांनी यावेळी केला.

पाणी पुरवठा सभापती फारूक पटेल म्हणाले, हरीत शहर करण्यासाठी लावलेले झाडे नियमात नव्हती. त्यांची उंची कमी होती. तसेच ते जगविलेही नाहीत. परंतु गुत्तेदार पोसण्यासाठी २२०० रूपये बील यासाठी अदा करण्यात आला. हे काम केवळ नगराध्यक्ष गुत्तेदार पोसण्यासाठी करीत आहेत. पाणी पुरवठा विभागाच्या योजनाही शासनाच्या आहेत. यामध्ये नगराध्यक्षांनी श्रेऊ नये. स्वता:ची पाठ थोपटून घेण्याचे काम बंद करावे, असा सुचक सल्लाही पटेल यांनी केला. तसेच दरडोई १३५ लिटर पाणी देणे बंधनकारक असून त्यासाठी आघाडी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. नगराध्यक्षांनी विकास कामाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करु नये असे ते म्हणाले.अमर नाईकवाडे झाले आक्रमकबीड पालिकेतील सर्व कारभार नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर हे धाब्यावर बसून करीत आहेत. जिल्हा रूग्णालयाजवळील रस्त्याचे काम आमदार फंडातून होत असल्याचा गाजावाजा त्यांनी केला. परंतु हे आमदार फंडातून नव्हे तर दलीत वस्ती सुधार योजनेंतर्गत करण्यात आलेले आहे. त्याचा पुरावाही नाईकवाडे यांनी यावेळी सादर केला. शहरातील शासकीय योजनांमधून झालेली कामे, विकास याबाबत नाईकवाडे यांनी पुरावे सादर केले. पुढे ते म्हणाले, विशेष सभेबाबत वारंवार पत्र दिले, परंतु आठवडा उलटूनही त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. असेच प्रकार वारंवार होत आहेत. आम्ही श्रेयासाठी नव्हे तर विकासासाठी लढत आहोत, असा खुलासाही अमर नाईकवाडे यांनी केला.