शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारींचे निरसन करण्यासाठी मनपाचे वॉररूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:29 IST

नागरिकांच्या तक्रारी त्वरित सोडविण्यासाठी खास एका वॉररूमची स्थापना करण्यात येणार आहे. मनपाशी संबंधित माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा वापरही प्रभावीपणे करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या कोणत्याही विभागात अथवा वॉर्ड कार्यालयात नागरिकांनी साध्या कागदावर तक्रार केली तर त्याची अजिबात दखल घेण्यात येत नव्हती, त्यामुळे नागरिकांनी महापालिकेला दूषणे देत तक्रारी करणेच बंद करून टाकले होते. महापालिकेची ही प्रतिमा बदलण्यासाठी आता सकारात्मक प्रयत्न सुरू झाले आहेत. नागरिकांच्या तक्रारी त्वरित सोडविण्यासाठी खास एका वॉररूमची स्थापना करण्यात येणार आहे. मनपाशी संबंधित माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा वापरही प्रभावीपणे करण्यात येणार आहे.स्मार्ट सिटी योजनेंतर्गत महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात वॉररूम सुरू केली जाणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर अधिकारी व कर्मचारी अजिबात दखल घेत नव्हते. मनपा प्रशासनाच्या या हेकेखोर भूमिकेमुळे नागरिकांचा मनपा प्रशासनावर रोष वाढला आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जावी, समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्र्गत मनपाच्या मुख्य कार्यालयात वॉर रूम सुरू करण्याचा निर्णय महापौर घोडेले यांनी घेतला आहे. वॉररूम सुरू करण्यासाठी आयुक्त डी.एम. मुगळीकर यांच्याशी चर्चा केली असून, त्यांनीही त्वरित तयारी दर्शवली. वॉर रूममध्ये प्राप्त होणाºया तक्रारींची नोंद घेतली जाणार आहे. नागरिकांकडून प्राप्त होणारी तक्रार संबंधित विभागाकडे पाठविण्यात येईल, त्या विभागाकडे पाठपुरावा करून तक्रारींचे निराकरण करण्यात येऊन नागरिकांना त्याबद्दलची माहिती वॉर रूमद्वारे कळवण्यात येईल.तक्रार सोडवण्यासाठी ७ दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागणार नाही. या तक्रारींचा दररोजचा अहवाल महापौर कार्यालयात मागवण्यात येईल. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिक आणि मनपा प्रशासन यांच्यात समन्वय साधला जाईल.