शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

स्पीड गव्हर्नरशिवाय मनपाची वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:54 IST

स्पीड गव्हर्नर यंत्रणा बसविल्याशिवाय व्यावसायिक वाहने रस्त्यावर धावूच नयेत, असा दंडकच परिवहन विभागाने केला आहे. औरंगाबाद महापालिकेने स्वत:च्या मालकीच्या आणि भाडेतत्त्वावर घेतलेल्या एकाही वाहनाला स्पीड गव्हर्नर यंत्रणा बसविलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्पीड गव्हर्नर यंत्रणा बसविल्याशिवाय व्यावसायिक वाहने रस्त्यावर धावूच नयेत, असा दंडकच परिवहन विभागाने केला आहे. औरंगाबाद महापालिकेने स्वत:च्या मालकीच्या आणि भाडेतत्त्वावर घेतलेल्या एकाही वाहनाला स्पीड गव्हर्नर यंत्रणा बसविलेली नाही. गुरुवारी सायंकाळी मनपाने ताब्यात घेतलेल्या खाजगी टँकरने सिडकोत तरुणीला चिरडले. या वाहनधारकाकडे तर कोणतीच कागदपत्रे, गव्हर्नर नसल्याचे समोर आले आहे. यांत्रिकी विभाग वाहनांना स्पीड गव्हर्नर यंत्रणा बसविण्याकडे दुर्लक्ष करीत आहे.स्पीड गव्हर्नर बसविण्यासंदर्भात १ मे २०१७ रोजी शासनाकडून अधिसूचना काढण्यात आली. परिवहन आयुक्तांनी ९ मे रोजी परिपत्रक काढले. ज्या वाहनांना स्पीड गव्हर्नर बसवलेले नसतील त्यांना फिटनेस सर्टिफिकेट न देण्याचे आदेश या परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व आरटीओंना दिले आहेत. वाढत्या अपघाताचे कारण अतिवेग असल्यामुळे राज्यातील सर्व अवजड वाहनांना स्पीड गव्हर्नर बसविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.औरंगाबाद महापालिकेकडे २८० पेक्षा अधिक वाहने स्वत:ची आहेत. या शिवाय भाडेतत्त्वावर घेतलेल्या वाहनांची संख्या जवळपास २५० आहे. या सर्व वाहनांना स्पीड गव्हर्नर यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडे ८४ टँकर भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहेत. या वाहनांना स्पीड गव्हर्नर यंत्रणा नाही. गुरुवारी मनपाच्या एका टँकरचालकाने सिडको एन-५ भागात एका दुचाकीस्वार तरुणीला चिरडले. या अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली. मनपाच्या टँकरला स्पीड गव्हर्नर बसविलेले असते तर दुर्घटना टाळता आली असती. मनपाच्या यांत्रिकी विभागातील अधिकारी व कर्मचारी शासन आदेशानुसार नवीन यंत्रणा बसविण्यास तयार नाहीत.