औरंगाबाद : सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडून देण्यात येणारी वाढीव पाणीपट्टीची बिले महापालिका प्रशासनाच्या कृपेनेच येत असल्याचा खळबळजनक खुलासा शहर अभियंता एस. डी. पानझडे यांनी आज आयुक्तांच्या दालनात केला. कंपनीची बाजू योग्य असल्याचे सांगण्यासाठी त्यांनी मनपातील कर्मचाऱ्यांच्या श्रम संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. शिवसेना आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये याप्रकरणी संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे. माजी आ.जैस्वाल यांनी पाणीपट्टी वसुली मनपाने करावी, या मागणीचे निवेदन आयुक्त पी. एम. महाजन यांना दिले. त्यावेळी वाढीव बिलांप्रकरणी स्पष्टीकरण देताना शहर अभियंता पानझडे म्हणाले, पाणीपट्टीची वाढीव बिले मनपाच्या चुकीमुळे येत आहेत. आजवर ज्या नागरिकांनी पाणीपट्टी भरली आहे, त्याची नोंद संबंधित विभागाने घेतलेलीच नाही. बिलांची नोंद न घेताच नळधारकांचे रेकॉर्ड कंपनीला दिले आहे. आपण रेकॉर्ड अपडेट करून देणे गरजेचे होते. आपल्या लोकांच्या चुकीमुळेच वाढीव बिले दिली जात आहेत.
बोगस बिलांना मनपा जबाबदार
By admin | Updated: December 27, 2014 00:47 IST