शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

निलंबित अधिकाºयांसाठी मनपा सभागृह एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:14 IST

महापालिकेतील निलंबित अधिकाºयांना परत सेवेत घेतल्याच्या मुद्यावर सोमवारी सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेतील निलंबित अधिकाºयांना परत सेवेत घेतल्याच्या मुद्यावर सोमवारी सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला. शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी आयुक्तांच्या निर्णयाला विरोध दर्शविला. आयुक्तांचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा शिवसेना, भाजप, एमआयएम, काँग्रेस आदी पक्षांनी दिला. संपूर्ण सभागृह निलंबित अधिकाºयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. शेवटी जंजाळ यांनी गदारोळ करून स्वत:चे एक दिवसासाठी निलंबन करून घेतले.सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर जंजाळ यांनी चर्चेत भ्रष्ट अधिकाºयांचा मुद्या उपस्थित केला. भाजपसह सर्वच पक्षांचे नगरसेवक हा मुद्या नको, विषयपत्रिका घ्या, असा आग्रह धरला. या मुद्यावरून सभागृहात गोंधळ सुरू झाला. महापौरांनी त्वरित पाच मिनिटांसाठी सभा तहकूब केली. महापौरांच्या अ‍ॅन्टी चेंबरमध्ये गुप्त खलबते सुरू झाली. जंजाळ यांनी काही नकली नोटा सोबत आणल्या होत्या. त्या आयुक्तांच्या अंगावर भिरकावणार असल्याचे सांगितले. आयुक्तांनीही यापुढे मी सर्वसाधारण सभेला येणार नाही, असा गर्भित इशारा दिला. महापौर व इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करून जंजाळ यांच्याकडील नोटा काढून घेतल्या. सभेत निलंबित अधिकाºयांच्या मुद्यावर चर्चा घेण्याचे ठरले. चर्चेत प्रशासनाकडून आयुक्त, उपायुक्त अय्युब खान यांनी संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. शासन आदेशानुसार सर्व निलंबित अधिकाºयांची विभागीय चौकशी सुरू असून, या चौकशीच्या आधीनच त्यांना कामावर घेण्यात आल्याचे वारंवार सांगण्यात आले. मात्र, जंजाळ यांचे समाधान होतच नव्हते. त्यांनी राजदंडही ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी सेनेचा एकही नगरसेवक त्यांच्यासोबत आला नाही. उलट भाजप, एमआयएम पक्षांनी महापौरांचा राजदंड पकडून ठेवला. अ‍ॅन्टी चेंबरमध्ये ठरल्याप्रमाणे महापौर बापू घडामोडे यांनी जंजाळ यांचे सदस्यत्व एक दिवसासाठी निलंबित केले. यानंतर जंजाळ यांचे समाधान झाले.