शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन थकले !

By admin | Updated: May 11, 2017 23:42 IST

लातूर : लातूर मनपातील ६५० सफाई कामगार आणि वर्ग-३ च्या १५० कर्मचाऱ्यांचे वेतन थकले

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : लातूर मनपातील ६५० सफाई कामगार आणि वर्ग-३ च्या १५० कर्मचाऱ्यांचे वेतन थकले असून, साह्य अनुदान बंद झाल्याने मनपाचा कोष बिघडला आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांवरही उपासमारीची वेळ आली आहे. लातूर मनपाच्या आस्थापनातील कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन २ कोटी २५ लाखांचे आहे. शासनाकडून २ कोटी ८० लाख साह्य अनुदान मिळत होते. मात्र ते वर्षभरापासून बंद झाल्याने मनपाच्या तिजोरीवर ताण पडत आहे. विकास कामे तर सोडाच, कर्मचाऱ्यांचे वेतन करणेही मुश्किलीचे झाले आहे. महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुका मनपा फंडातून झाल्या आहेत. त्यामुळेही कोष बिघडला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वर्ग-३ च्या दीडशे कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. तर ६५० सफाई कामगारांचे एप्रिल महिन्याचे वेतन थकले आहे. केवळ साह्य अनुदान बंद झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनेचे पैसे वेतन अथवा आस्थापना खर्चासाठी वापरता येत नाही. त्यामुळे साह्य अनुदानावर कर्मचाऱ्यांचे वेतन अवलंबून होते. मात्र साह्य अनुदान बंद झाल्यामुळे वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन महिन्यांपासून वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांचे तर एक महिन्यापासून सफाई कामगारांचे वेतन रखडले आहे. त्यांच्याकडून दररोज वेतनाची मागणी होत आहे. मात्र अद्याप काहीही तोडगा निघाला नाही. कर्मचारी वेतनासाठी त्रस्त आहेत. (अधिक वृत्त हॅलो/२ वर)