शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

पाण्यासाठी नगरसेवकपती टाकीवर

By admin | Updated: May 23, 2016 23:48 IST

लातूर : महापालिकेने नळाद्वारे पाणी द्यावे या मागणीसाठी काँग्रेसच्या नगरसेविका योजना कामेगावकर यांचे पती नागसेन कामेगावकर यांनी सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास

धुंदीत आंदोलन : पोलीस अन् अग्निशमन दलाची धावपळलातूर : महापालिकेने नळाद्वारे पाणी द्यावे या मागणीसाठी काँग्रेसच्या नगरसेविका योजना कामेगावकर यांचे पती नागसेन कामेगावकर यांनी सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक बार्शी रोडवरील एमजेपीच्या टाकीवर चढून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली़ दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी टाकीवर चढून कामेगावकर यांची समजूत घालत त्यांना खाली उतरविले़ मात्र, त्यांनी मद्यपान केल्याची शक्यता आल्याने पोलिसांनी त्यांना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात पाठविले आहे़लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई आहे़ टँकरद्वारे मनपाने पाणी वितरण सुरू केले आहे़ नळाने पाणी देणे शक्य नसल्याचे मनपा प्रशासनाने वारंवार सांगूनही आंदोलने करून लक्ष वेधले जात आहे़ सोमवारी सायंकाळी अचानक प्रभाग क्ऱ१७ च्या नगरसेविका योजना कामेगावकर यांचे पती नागरसेन कामेगावकर यांनी अचानक बार्शी रोडवरील टाकीवर धाव घेतली़ नळाला पाणी सोडलेच पाहिजे, असे म्हणत ते टाकीवर चढले़ यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली़ याबाबतची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ तसेच अग्नीशमन दलाचेही एक वाहन येऊन थांबले़ यावेळी पोलिसांनी कामेगावकर यांची समजूत काढली़ पण ते वेगळ्याच धुंदीत असल्याने बराचवेळ त्यांनी दाद दिली नाही़ दरम्यान, मनपा उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी भ्रमणध्वनीवरून त्यांच्याशी संवाद साधला़ तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या आपण खाली बसून चर्चा करू, असे सांगितल्यावर ते खाली आले़वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात़़़दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी नागसेन कामेगावकर यांना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात पाठविले आहे़ कामेगावकर यांनी मद्यप्राशन केल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे़ घटनास्थळी एमआयडीसीचे सपोनि़ सुधाकर बावकर, मनपा उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी भेट देऊन चर्चा केली़ मनपात काँग्रेसची सत्ता असताना सत्ताधारी नगरसेवकाच्या पतीला आंदोलन करण्याची वेळ आल्याची चर्चा रंगली आहे़ दरम्यान, कामेगावकर यांना हे आंदोलन चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आहे़