शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

महापालिकेचे उत्पन्न वाढले

By admin | Updated: May 23, 2014 01:11 IST

नांदेड: आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या महापालिकेचे उत्पन्न आता ८० कोटीहून ११० कोटीवर गेले असून मागील दोन वर्षात राबविण्यात आलेल्या उपक्रमांना शहरवासियांचे मोठे पाठबळ मिळाले

नांदेड: आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या महापालिकेचे उत्पन्न आता ८० कोटीहून ११० कोटीवर गेले असून मागील दोन वर्षात राबविण्यात आलेल्या उपक्रमांना शहरवासियांचे मोठे पाठबळ मिळाले, अशी माहिती आयुक्त जी़ श्रीकांत यांनी दिली़ आयुक्त जी़श्रीकांत यांना महापालिकेचा कार्यभार सांभाळताना आज दोन वर्ष पूर्ण झाले़ त्या निमित्ताने ते पत्रकारांशी बोलत होते़ मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात अनेक नव्या योजना हाती घेवून महापालिकेचे आर्थिक बळ वाढविण्यात आले़ याविषयी ते म्हणाले, महापालिकेचे उत्पन्न वाढीचे स्त्रोत बळकट करण्यासाठी नवीन विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल ) लागू झाल्यानंतर या आर्थिक वर्षात १ हजार ४८३ मालमत्ताधारकांना बांधकाम परवानगी देण्यात आली़ त्यातुन महापालिकेला १९ कोटींचा महसूल मिळाला़ मागील ५ वर्षात हा आकडा ६ कोटींच्या आत होता़ शहरातील अनधिकृत बांधकाम नियमित न केल्यामुळे आम्ही कारवाई केली़ यावेळी काही राजकीय दबाव आले़ मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आम्ही कारवाई सुरू ठेवली़ एलबीटीच्या संदर्भात शहरातील व्यापारी नाराज आहेत़ परंतु एलबीटी रद्द करा, ही मागणी आम्ही पूर्ण करू शकत नाहीत़ गुंठेवारी, पारगमन, मालमत्ता कर या माध्यमातून महापालिकेचे उत्पन्न वाढले़ हे करताना काहींचा पाठींबा मिळाला तर काहींनी विरोध केला़ जे योग्य आहे तेचे केले़ विसावा उद्यानात सोयी सुविधा नाहीत़ त्यामुळे याच उद्यानात अत्याधुनिक उद्यानाची संकल्पना राबवण्यात येत आहे़ शहरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत़ आतापर्यंत ८४ कॅमेरे बसवले असून १६ सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच लागणार आहेत़ मात्र काही प्रकल्प पूर्ण करू शकलो नाही, हे दुर्देव समजतो़ तुप्पा येथील घनकचर्‍यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प अनेक कारणामुळे पूर्ण होवू शकला नाही़ (प्रतिनिधी) हार्डशिप प्रिमियमनुसार चांगले उत्पन्न मिळाले़ नागरिकांकडून बांधकाम करताना परवानगी घेऊनच चटईक्षेत्रानुसार बांधकाम करण्यात येत आहे़ शहरातील नवीन कामे बीओटी तत्वावर करण्यात येत आहे़ महाराजा रणजितसिंघ मार्केट प्रकल्पही बीओटी तत्वावर सुरू करण्यात येत आहे़ खेळाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी जलतरनिका, बॅडमिंटन हॉल, स्टेडियमचा विकास हाती घेतला आहे़ स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय पातळीचे क्रिकेटचे मैदान तयार करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत़ धोकादायक इमारतींची पुर्नतपासणी करण्यात आली असून अहवाल प्राप्त होताच कारवाई करण्यात येईल़ यावेळी संबंधित इमारतीतील व्यापार्‍यांना दुसर्‍या ठिकाणी गाळे उपलब्ध करून दिले जातील़ महापालिकेच्या कार्यालयीन कामकाजाचे संगणकीकरण केले असून विविध विभागात ई - गव्हर्नस अंतर्गत नागरीकापर्यंत सेवा सुविधा देण्यात चांगले काम केले आहे़ कर्मचार्‍यांचे वेतन हे आॅनलाईन पद्धतीने सुरू केले आहे़ शहर सुरक्षेच्या दृष्टीने महापालिका हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे़ जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत तरोडा भाग, सिडको, हडको या भागासाठी पाणीपुरवठा व जल:निस्सारणाचे कामे हाती घेण्यात आले आहेत़ महापालिकेतील कर्मचार्‍यांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात आले़ याउलट जे कर्मचारी आपल्या कामात हलगर्जी करत होते, अशा ४० कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले़ लोकहिताचे कामे केले लोकहितांच्या योजनासंदर्भात जी़ श्रीकांत म्हणाले, शहरातील नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात आले़ बीएसयुपी योजनेद्वारे गोरगरीबांना हक्काचे पक्के घरे मिळाले़ तरोडावासियांना घरकुले, पाणी, ड्रेनेजलाईन, रस्ते या सुविधा देण्याचा प्रयत्न केला़ कौठा भागातीलही हे प्रश्न सोडविण्यात आले़ त्यामुळे समाधान आहे़ अनेक नव्या योजना राबवण्याचा संकल्प व्यक्त करताना ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम करण्यासाठी कंत्राटदारांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत़ बॅटमेंटनचे नुतनीकरण करण्यात आले आहे़ विस्तारीत विसावा उद्यानाचे काम सुरू आहे़ अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी डॉक्टरलेनमध्ये नुकतीच कारवाई करण्यात आली होती़ त्यानंतर बांधकाम नियमित करण्यासाठी १४ प्रस्ताव प्राप्त झाले आहे़