औरंगाबाद : महापालिकेचे शिष्टमंडळ २७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन १०० कोटी रुपये अनुदान मागणीचे निवेदन सादर करणार आहे. ते दुष्काळ आढाव्यानिमित्त शहरात येणार आहेत. फडणवीसांना हे पहिले निवेदन देण्यात येणार असून त्याचा मसुदा महापौर कला ओझा यांच्या लेटरहेडवर तयार करण्यात येणार आहे. महापौरांघरी मंगलकार्य असल्यामुळे ते भेटीसाठी येतील की नाही, हे सांगता येत नाही. मात्र, भाजपा व विरोधी पक्षातील पदाधिकारी फडणवीसांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहेत. उपमहापौर संजय जोशी यांनी सांगितले, १०० कोटी रुपये रस्ते विकासासाठी मिळावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना करण्यात येणार आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेईल. त्यासाठी निवेदन तयार करण्यात येत आहे. महापौर, विरोधी पक्षनेते, गटनेते, सभापती, सभागृह नेते शिष्टमंडळात असतील.४महापौरांचे लेटरहेड घेण्यामागे प्रोटोकॉलचे कारण सांगितले जात आहे. महापौर आल्या नाहीतर त्यांच्याऐवजी उपमहापौर जोशी हेच शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील, अशी चर्चा आहे.४शिवसेना- भाजपा हे दोन्ही पक्ष वेगळे झाले आहेत. मनपा निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही पक्ष कशा पद्धतीचे राजकारण करतील हे सांगता येत नाही. मुख्यमंत्र्यांना भेटण्यावरून सत्ताधाऱ्यांमध्येच दोन गट पडू शकतात.
शहरासाठी मुख्यमंत्र्यांकडे मनपाची १०० कोटींची मागणी
By admin | Updated: November 26, 2014 01:11 IST