शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हगणदारीमुक्त शहरासाठी पालिकेची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:10 IST

जालना : शहर हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव पालिकेने घेतला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहर हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव पालिकेने घेतला आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नागरिक आजही उघड्यावर शौचास जात आहेत. वैयक्तिक शौचालयांचे कामही अपूर्ण आहे. लवकरच राज्यस्तरीय पथक शहरात तपासणीसाठी येणार असल्याने पालिका प्रशासनाची धावपळ सुरू आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्रत्येक शहर व गाव हगणदारीमुक्त करण्याचा शासनाचा निर्धार आहे. त्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. या अभियानात सहभाग घेतलेल्या जालना नगरपालिकेने शहर संपूर्ण हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव घेतला आहे. परंतु प्रत्यक्षात शहरातील स्थिती वेगळी आहे. २०१५-१६ मध्ये केलेल्या सर्वेनुसार पालिकेला तेरा हजार २०२ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट होते. पैकी पाच हजार २१० शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, त्याचा वापर सुरू आहे. उर्वरित शौचालयांचे काम ७० टक्के काम पूर्ण झाल्याचे पालिका प्रशासन सांगत आहे. ज्या भागात नागरिक उघड्यावर शौचास जातात तिथे पालिकेने सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधली आहेत. उघड्यावर न बसता या स्वच्छतागृहांचा वापराच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी गुड मॉर्निंग पथकांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हास्तरीय पथकाने नुकतीच शहरात येऊन तपासणी केली. आता लवकरच राज्य व केंद्र स्तरावरील पथक शहरात अचानक तपासणी करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून शौचालयाचा वापर करावा यासाठी प्रत्येक प्रभागात पथनाट्ये, पोस्टर, बॅनर व अन्य माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.