शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मनपा चालविणार औरंगाबाद दर्शन बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 01:08 IST

औरंगाबाद : औरंगाबाद शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही भरपूर आहे. पर्यटन क्षेत्रातही काम करण्यासाठी

औरंगाबाद : औरंगाबाद शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही भरपूर आहे. पर्यटन क्षेत्रातही काम करण्यासाठी मनपा व इतर शासकीय विभागांना खूप वाव आहे. भविष्यात आम्ही सर्व मिळून विविध उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. पुण्याच्या धर्तीवर औरंगाबाद दर्शन बस सुरू करण्याचाही विचार सुरू असल्याचे मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले.शहरात पूर्वी ५२ दरवाजे होते. त्यातील मोजकेच दरवाजे आता शिल्लक राहिले आहेत. त्यांना परत गतवैभव कसे प्राप्त करून देता येईल, यावर भर देण्यात येईल. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात आम्ही यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूदही केली आहे. दरवाजांसमोर सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येणार आहे. मकबऱ्याकडे जाणारा रस्ता पर्यटकांना आकर्र्षित करणारा असायला हवा. शहरातील विविध कंपन्यांशी चर्चा करून सीएसआर उपक्रमात या रस्त्याचे सौंदर्यीकरण करण्याचा विचार आहे. शहरातील पर्यटनस्थळांवर दिवसभर फिरता यावे यादृष्टीने एक बस सुरू करण्याचाही मानस आहे. मोठ्या कंपन्यांकडून बस सीएसआर उपक्रमात मिळू शकते का, याची चाचपणी सुरू आहे. आमदार, खासदार निधीतूनही बस मिळविण्यासाठी मनपा प्रयत्न करणार असल्याचे मनपा आयुक्तांनी नमूद केले.२४ कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांमध्ये तीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचे उत्तर अजून प्रशासनाला प्राप्त झाले नाही. उत्तर आल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. समांतर जलवाहिनीला करारानुसार १७ कोटी रुपये द्यायचे आहेत. मनपाच्या लेखा परीक्षण विभागाने काही आर्थिक अनियमितता काढली आहे. यासंदर्भात कंपनीने उत्तर प्राप्त झाल्यावर निधी वितरित करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.