शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सुविधा न देताच मनपाची वसुली

By admin | Updated: January 15, 2016 23:55 IST

औरंगाबाद : पाणीपुरवठ्याची बोंब आणि कचरा उचलला गेला नसतानाही महापालिकेने मागील सहा महिन्यांत या सेवा दिल्याचे सांगत सातारा- देवळाई नगर परिषदेकडे ५१ लाखांहून अधिक रकमेची मागणी करणारे पत्र दिले आहे.

औरंगाबाद : पाणीपुरवठ्याची बोंब आणि कचरा उचलला गेला नसतानाही महापालिकेने मागील सहा महिन्यांत या सेवा दिल्याचे सांगत सातारा- देवळाई नगर परिषदेकडे ५१ लाखांहून अधिक रकमेची मागणी करणारे पत्र दिले आहे. महापालिकेच्या मुख्य लेखाधिकाऱ्यांनी शुक्रवारी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना हे पत्र पाठविल्याने सातारा- देवळाईतील नागरिक आणि नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सातारा- देवळाई नगर परिषदेचा भाग महापालिकेत २१ मे रोजी २०१५ रोजी समाविष्ट करण्यात आला. दरम्यानच्या काळात मनपाने येथे आरोग्य केंद्र फक्त तडकाफडकी सुरू केले, एक वैद्यकीय अधिकारी, नर्स व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. ६ कोटी ६५ लाखांच्या जवळपास निधी मनपाने नगर परिषदेच्या खात्यावर वर्ग केला आहे; परंतु पूर्वीची वसुली आणि चालू वर्षाची वसुली, अल्पसंख्याकबहुल वसाहत धनादेश प्राप्त, अशी एकूण १ कोटी २३ लाख २४ हजार १२२ रुपये जमा झाले होते; परंतु या काळात समाविष्टतेचा वाद उफाळून आला आणि कायदेशीररीत्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढून हरकती व सूचना मागितल्या. वर्ग झालेली रक्कम व हिशोब परत करावा, असे मागणीपत्र नगर परिषदेने १ जानेवारी १६ रोजी पदभार सोपविल्यावरच दिले. या ६ महिन्यांच्या काळात महापालिकेने पाणीपुरवठ्यासह कर्मचारी वेतन, टँकरद्वारे पाणी खर्च, घनकचरा व्यवस्थापन खर्च, आरोग्य विभाग खर्च, असा एकूण १ कोटी ७४ लाख ३३ हजार १०३ रुपये खर्च झाले असल्याचा दावा केला आहे. महानगरपालिकेने प्राप्त निधीपेक्षा ५१ लाख ८,९८१ रुपये अधिकचे खर्च केले असून, ते नगर परिषदेने मनपाला वर्ग करावेत, असे नोटिसीद्वारे कळविले आहे. नागरी समस्यांसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे बाळासाहेब गायकवाड, अप्पासाहेब हिवाळे, स्वप्नील शिरसाट, दीपक गायकवाड, राहुल शिरसाट, शेख झिया, काँग्रेसचे तालुका सरचिटणीस हरिभाऊ राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल शिंदे, अलियार खान आदींनी दिला आहे.