शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
4
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
5
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
6
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
7
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
8
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
9
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
10
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
11
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
12
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
13
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
14
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
15
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
16
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
17
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
18
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
19
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
20
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

कळंब पालिकेत मुंदडा यांची वर्णी

By admin | Updated: December 31, 2016 23:29 IST

कळंब : येथील नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे संजय मुंदडा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

उस्मानाबाद : शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा उठवित राष्ट्रवादी पक्षाने आपल्या नगरसेवकांची फौज शिवसेनेचे नगरसेवक सुरज साळुंके यांच्या पाठीशी उभी केल्याने सेना-भाजपाच्या अधिकृत उमेदवाराला उपाध्यक्षपदाच्या पराभवाला सामोरे जावे लागले. साळुंके यांनी भाजप-सेनेचे उमेदवार योगेश जाधव यांचा नऊ मतांनी पराभव केला. त्यामुळे ही एकप्रकारे भाजपा शिवसेनेला मोठी चपराक मानली जात आहे.पालिकेत सेना, भाजप अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. सेना-भाजपा युती करण्यासाठी दोन्ही पक्षात चर्चाही सुरु होती. परंतु, दोघांनीही उपाध्यक्षपदावर दावा ठोकल्याने युतीचा निर्णय शुक्रवारी सायंकाळपर्यंत झाला नव्हता. रात्री उशिरा निर्णय होवून उपाध्यक्षपद भाजपाला देण्याचा निर्णय झाला. मात्र काहीतरी वेगळ्याच घडामोडी घडण्याचे संकेत मिळत होते. शनिवारी सकाळी निवडणूक प्रक्रियेला नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत सुरूवात झाल्यानंतर युतीचे उमेदवार म्हणून भाजपाचे योगेश जाधव यांनी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादीकडून अभय इंगळे यांनी अर्ज भरला. दरम्यान, ‘पक्षाने शब्द पाळला नाही’, असा आरोप करीत सेनेचे नगरसेवक तथा युवा सेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके हेही उपाध्यक्षपदाच्या रिंगणात उतरले. साळुंके यांच्या उमेदवारीमुळे युतीच्या उमेदवार अडचणीत आल्याचे लक्षात आल्यानंतर साळुंके यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपा पदाधिकारी, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह शिवसेना जिल्हा प्रमुख सुधीर पाटील, यांनी केला. वरिष्ठ नेत्यांनीही भ्रमणध्वनीवर संपर्क साधून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे सर्व प्रयत्न निष्पळ ठरले. दरम्यान, नाराजीनाट्यावर नजर ठेवून असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने साळुंके यांना मदत करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे भाजपासह सेनेच्या नेत्यांची मध्यस्ती फोल ठरली. अखेरच्या दोन-तीन मिनिटात राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठीने अभय इंगळे यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितले. त्यानुसार इंगळे यांनी अर्ज मागे घेतल्याने युतीचे उमेदवार योगेश जाधव आणि सुरज साळुंके यांच्यात थेट लढत झाली. दगाफटका होणार हे गृहित सर्व नगरसेवकांनी युतीचे उमेदवार योगेश जाधव यांना मतदान करावे, असा व्हीप बजावण्यात आला. परंतु, सेनेच्याच सहा नगरसेवकांनी व्हीप झुगारून साळुंके यांना मतदान केले. राष्ट्रवादीच्या १७ नगरसेवकांनीही आदेशाप्रमाणे साळुंके यांच्या पाठीशी ताकद उभी केली. एका अपक्षानेही साळुंके यांनाच मतदान केले. त्यामुळे साळुंके यांच्या पारड्यात २४ तर योगेश जाधव यांच्या खात्यात भाजपा सात, सेना पाच, काँग्रेस दोन आणि नगराध्यक्षाचे एक अशी १५ मते पडली. निवडीनंतर सुरज साळुंके यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण अन् फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.