शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

ढोल-ताशांची मुंबई संस्कृती लातूर शहरातही रुजतेय !

By admin | Updated: August 25, 2016 01:01 IST

राजकुमार जोंधळे , लातूर पुण्या-मुंबईत प्रसिध्द असलेल्या ढोल-ताशांच्या संस्कृतीला लातुरातही आता पोषक वातावरण मिळत असल्यामुळे ही संस्कृती लातुरातही रुजू लागली आहे.

राजकुमार जोंधळे , लातूरपुण्या-मुंबईत प्रसिध्द असलेल्या ढोल-ताशांच्या संस्कृतीला लातुरातही आता पोषक वातावरण मिळत असल्यामुळे ही संस्कृती लातुरातही रुजू लागली आहे. परिणामी, शहरात विविध ठिकाणी गणेश मंडळांकडून गणरायाच्या स्वागतासाठी झांज आणि ढोल-ताशा पथकांकडून गत दोन महिन्यांपासून रंगीत तालीम सुरु आहे. गावभागातील मंडळांकडून सर्वप्रथम ढोल-ताशांची संकल्पना राबविण्यात आली. या ढोल-ताशा आणि झांज पथकाला आता २० वर्ष होत आहेत. डॉल्बीच्या जमान्यात ढोल-ताशांच्या संस्कृतीची जपणूक शहरातील ३० गणेश मंडळांकडून केली जात आहे. पुण्या-मुंबईत रुजलेल्या ढोल-ताशांच्या संस्कृतीविषयी गावाकडच्या माणसांमध्ये अप्रूप होते. शेवटी, पुण्या-मुंबईच्या धर्तीवर लातुरातही ढोल-ताशांच्या पथकांची संकल्पना ‘धाडस’ कला पथकाच्या युवकांनी साकारली आहे. यासाठी त्यांनी प्रारंभी वर्गणीतून पाच ढोलची खरेदी केली आहे.डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे होणारे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आता विविध गणेश मंडळांनी पुढाकार घेतला आहे. डॉल्बीला पर्याय म्हणून पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून उत्सव साजरा करण्याचा संकल्प या गणेश मंडळांनी केला आहे. शहरात सध्या विविध गणेश मंडळांकडून डॉल्बीपेक्षा ढोल-ताशाला अधिक महत्व दिले जात आहे. या संस्कृतीमुळे ढोल-ताशाला गतवैभव मिळाले आहे.गणेशोत्सव अवघ्या १० दिवसांवर येवून ठेपला असून, गणरायाच्या जंगी स्वागतासाठी शहरातील विविध गणेश मंडळांकडून गेल्या दोन महिन्यांपासून ढोल, ताशा, झांज पथकांकडून रंगीत तालीम सुरु आहे. दररोज सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास शहरातील गावभाग, मित्रनगर, बप्पा गणेश मंडळ भुसार लाईन, औसा हनुमान, शाम नगर, प्रकाश नगर, खाडगाव रोड परिसर, औसा रोड, आदर्श कॉलनी, जुना औसा रोड, शाहू चौक, कापड लाईन, साळे गल्ली, हत्तेनगर, सिध्देश्वर वेस आदी ठिकाणी या गणेश मंडळांकडून जय्यत तयारी सुरु आहे.लातूर शहरात मोठ्या प्रमाणावर ढोल-ताशांचे पथक निर्माण व्हावेत, यासाठी आनंद पांचाळ, उमेश धर्माधिकारी, गणेश मोहिते, महेश धर्माधिकारी, समीर शेख, स्रेहा कोळी, दीपिका मंत्री, श्रेया कवठाळे, दीपक जाधव, किशोर गिरी, नागेश सिंगनाथ, बालाजी पाटील, विकी पाटील यांनी आता पुढाकार घेतला आहे.