शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

करिअरसाठी बहुपर्याय

By admin | Updated: June 8, 2014 01:14 IST

औरंगाबाद : लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअर हे प्रदर्शन पाहण्यासाठी शनिवारी दिवसभर पालक व विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

औरंगाबाद : लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअर हे प्रदर्शन पाहण्यासाठी शनिवारी दिवसभर पालक व विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या प्रदर्शनात करिअरला बहुपर्याय उपलब्ध झाल्याने जणू ज्ञानाचा खजिनाच प्राप्त झाल्याचा आनंद साऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. एसएफएसच्या मैदानाला जणू शैक्षणिकनगरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मराठवाडाच नव्हे तर नगर, कोपरगाव, पुणे या शहरांतील नामांकित शैक्षणिक संस्थाही या प्रदर्शनात दाखल झाल्या आहेत. प्रत्येक स्टॉलवर संस्थेची परिपूर्ण माहिती, कोर्स व सुविधांची माहिती दिली जात आहे. याशिवाय सोबत माहितीपत्रकही देण्यात येत आहे. काही शैक्षणिक संस्थांनी प्रोजेक्टरवर आपल्या संस्थेची इमारत व कोर्सच्या व्हिडिओ क्लिप्सही दाखविण्याची व्यवस्था केली आहे. विद्यार्थी व पालक प्रत्येक कोर्सची चोखंदळपणे माहिती घेताना दिसून आले. मेडिकल, इंजिनिअरिंगशिवायही असंख्य अशा शाखा आहेत ज्यात विद्यार्थ्यांना आपले करिअर घडविता येते. याची माहिती या प्रदर्शनाच्या निमित्ताने औरंगाबादकरांसमोर आली. या प्रदर्शनात मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्टचर, फॅशन, ग्राफिक्स, इंटिरियर डिझाईनपर्यंत व रिटेल, आयटीआय, अ‍ॅनिमेशन, गेमिंग, हॉटेल मॅनजेमेंट, हॉस्पिटॅलिटी आदी शेकडो कोर्सची माहिती एकाच ठिकाणी मिळत आहे. समोरासमोरील दोन स्टॉलमधे पुरेसे अंतर ठेवल्याने पालक व विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रदर्शनात मोकळे फिरता येत आहे. या प्रदर्शनातून आम्हाला करिअरसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने आम्हाला करिअर निवडण्यासाठी मोठा वाव मिळाला अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवसलोकमत अस्पायर एज्युकेशन फेअरचा उद्या रविवार, दि.८ जून शेवटचा दिवस आहे. एस.एफ.एस.च्या मैदानावर सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. शालेय ते उच्चशिक्षित विद्यार्थी, पालक यांच्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरत आहे.आजचे चर्चासत्रवेळ- सायंकाळी ४ ते ५ वाजेदरम्यानविषय- टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट मार्गदर्शक- राघव रेड्डी.वेळ- सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यानविषय- एमपीएससी/यूपीएससी स्पर्धा परीक्षामार्गदर्शक- मनोहर भोले (द युनिक अकॅडमी, पुणे)वेळ- सायंकाळी ६ ते ७ वाजेदरम्यानविषय- भारतातील उभरत्या व नावीन्यपूर्ण करिअरच्या संधीमार्गदर्शक- अविनाश भावरीवेळ- रात्री ७ ते ८ वाजेदरम्यानविषय- इंजिनिअरिंगमधील योग्य करिअरमार्गदर्शक- डॉ. प्रमोद देशमुख (आयसीईईएम)प्रदर्शनातील नामांकित संस्थांची माहितीछत्रपती शाहू कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगपैठण रोडवरील कांचनवाडी येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग व सिव्हिल इंजिनिअरिंग हे पदवी शिक्षण दिले जाते. कॉलेज निसर्गरम्य वातावरणात असून उच्चशिक्षणासाठीच्या सर्व आधुनिक सोयी-सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.जेटकिंग लर्निंग सेंटरदेशात मागील ६७ वर्षांपासून शिक्षण देणारी जेटकिंग ही एकमेव हार्डवेअर आणि नेटवर्किंग संस्था आहे. औरंगाबादेत बन्सीलालनगर येथे संस्थेची शाखा असून जेसीएमएनई, जेसीएचएनपी हे कोर्स पूर्ण करणाऱ्यांना नोकरीची हमी संस्थेतर्फे देण्यात येते. याशिवाय येथे इथिकल हँकिंग, नेटवर्क सेक्युरिटी, क्लाऊड कॉम्प्युटिंगसारखे अ‍ॅडव्हान्स कोर्स शिकविले जातात. आयसीईईएमवाळूज येथील अल्पावधीत यशाचे शिखर गाठणारे अभियांत्रिकी महाविद्यालय, अशी ओळख आयसीईईएमची निर्माण झाली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या या संस्थेचा उद्योगजगताशी सतत संपर्क असतो. येथे अद्ययावत प्रयोगशाळा, संगणक कक्ष, अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वृंद येथे कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर येथे भर देण्यात येतो. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव यावा यासाठी नियमितपणे इंडस्ट्रीयल व्हिजिटही केल्या जातात. अ‍ॅमिटी ग्लोबल बिझनेस स्कूल, पुणेपुण्याच्या मध्यवर्ती भागात बिझनेस स्कूल उभारण्यात आले आहे. एमबीए व बीबीएचा अभ्यासक्रम शिकविला जातो. येथे वाय-फाय कॅम्पस् आहे. वातानुकूलित वातावरण आहे. येथे अ‍ॅडव्हान्स ट्रेनिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. अद्ययावत ग्रंथालय येथील वैशिष्ट्य आहे. कोर्सच्या काळात नामांकित कंपन्यांशी विद्यार्थ्यांच्या भेटी घडवून आणल्या जातात. तसेच अ‍ॅमिटीतर्फे नोकरीची हमीही दिली जाते. एमजीएम फिजियोथेरपी कॉलेजएमजीएमच्या कॅम्पसमध्ये फिजियोथेरपी कॉलेज सुरू करण्यात आले आहे. येथे ४ वर्षे कालावधीचा पदवी कोर्स व २ वर्षे कालावधीचा पदव्युत्तर कोर्स शिकविला जातो. कॉलेजमध्ये अद्ययावत सोयी-सुविधा पुरविण्यात येतात. हा कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना खाजगी, शासकीय रुग्णालय, एनजीओ, फिटनेस सेंटर आदी ठिकाणी मोठा वाव आहे. आय. टी. फॅक्ट इन्स्टिट्यूट सायबर सिक्युरिटी व एथिकल हॅकर्सची माहिती राष्ट्रीय पातळीवर संकलित करण्यात येत आहे. त्यासाठी लागणारे शिक्षण जसे हार्डवेअर-नेटवर्किंग, लिनक्स व विंडोज अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, एथिकल हॅकिंग यांचे अधिकृत प्रशिक्षण आय. टी. फॅक्ट इन्स्टिट्यूट फॉर एथिकल हॅकिंग अँड सायबर सिक्युरिटी संस्थेतील तज्ज्ञ ‘इंटेलिजन्स ब्युरो, रिसर्च अ‍ॅनालिसिस विंग, दहशतवादीविरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांना सर्वतोपरी मदत करतील. डिफेन्स करिअर अकॅडमी डिफेन्स करिअर अकॅडमित प्री-प्रायमरी तसेच पहिली ते सातवी (स्टेट बोर्ड व सीबीएसई ), आठवी ते दहावी (स्टेट बोर्ड) व अकरावी ते बारावी आर्टस्, कॉमर्स व सायन्स कॉलेज चालविल्या जाते. रेग्युलर शिक्षणासोबत बेसिक मिलिटरी ट्रेनिंग, तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी, असा त्रिवेणी विकास घडविणारी ही राज्यातील पहिली संस्था होय. द युनिक अकॅडमी द युनिक अकॅडमीने यूपीएससी-एमपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात नवा ठसा उमटविला आहे. सविस्तर व सखोल मार्गदर्शन, व्यक्तिगत लक्ष, परीक्षाभिमुख दृष्टिकोन, दर्जेदार व अद्ययावत नोटस् आणि भरपूर सराव चाचण्या हे अभ्यास वर्गाचे वैशिष्ट्य आहे. या संस्थेतून मार्गदर्शन घेतलेले सुमारे १७०० पेक्षा अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले आहेत. अनुभूती निवासी स्कूल अनुभूती निवासी स्कूलमध्ये इयत्ता ५ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग आहेत. येथे महाराष्ट्रासह ८ राज्यांमधून विद्यार्थी शिकायला येतात, तसेच १० राज्यांमधील अनुभवी तज्ज्ञ शिक्षक येथे गुणवत्तापूर्ण ज्ञानदानाचे काम करतात. दर ८ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक नेमण्यात आला आहे. याचा परिपाक म्हणजे १० वी व १२ वीच्या दोन बॅचेस उज्ज्वल यश मिळवून बाहेर पडल्या आहेत. अभियांत्रिकी, कला, वाणिज्य तसेच सीएच्या प्रवेश परीक्षेत १०० टक्के यश मिळविले आहे. संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटी, कोपरगावसंजीवनीच्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग येथे बी. ई. (सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल) अभ्यासक्रम शिकविले जातात. तसेच एम. ई. (कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स डिजीटल सिस्टीम, मेकॅनिकल डिझाईन), तसेच एम. ई. (सिव्हिल) इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगही शिकविले जातात. प्रशस्त परिसर, अद्ययावत ग्रंथालय, प्रयोगशाळा, डिजीटल क्लासरूम येथील वैशिष्ट्ये आहे. कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट पुष्पनगरी सोसायटीजवळील कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये विविध तांत्रिक कोर्स शिकविले जातात. येथे ७० टक्के प्रात्यक्षिकांवर भर देण्यात येतो. तज्ज्ञ शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते. या कोर्समुळे देश व विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळते, शिक्षण घेऊन अनेक जण चांगल्या पगाराच्या नोकरीला लागले आहेत, तर अनेक जण स्वत:चा व्यवसाय यशस्वीपणे करीत आहेत. फ्रेमबॉक्स अ‍ॅनिमेशन२००७ मध्ये सुरू झालेल्या या संस्थेने मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांचे अ‍ॅनिमेशन क्षेत्रात करिअर घडविले आहे. या संस्थेत विद्यार्थ्यांना अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील आवडीनुसार अनेक कोर्स उपलब्ध आहेत. यात ग्राफिक्स डिझाईन, वेब डिझाईन, थ्रीडी अ‍ॅनिमेशन, गेम डिझाईन, व्हिज्युअल इफेक्टस् , आर्किटेक्ट व्हिज्युअलायझेशन तसेच लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, बीएसी अ‍ॅनिमेशन हा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. गुरू मिश्री होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलअवघ्या पाच वर्षांच्या कालावधीत अग्रगण्य होमिओपॅथिक महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळविलेले. या कॉलेजमध्ये बॅचरल आॅफ होमिओपॅथिक मेडिसीन अँड सर्जरी (बी.एच.एम.एस.) हा साडेपाच वर्षांचा पदवी अभ्यासक्रम शिकविला जातो. या अभ्यासक्रमात तृतीय वर्षापासून ट्रेनिंगसाठी विद्यार्थ्यांना जालना शहरातील सर्जन, अस्थिरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आदी रुग्णालयांमध्ये पाठविले जाते. डीकेएमएस महाविद्यालयराज्यातील सर्वांत मोठे व प्रशस्त महाविद्यालय म्हणून डीकेएमएस होमिओपॅथिक कॉलेज ओळखले जाते. येथे बॅचरल आॅफ होमियोपॅथिक मेडिसीन अँड सर्जरी (बी.एच.एम.एस.) पदवी अभ्यासक्रम आहे. येथे पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम.डी.) तसेच पीएच.डी. करण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमात तृतीय वर्षापासून ट्रेनिंगसाठी विद्यार्थ्यांना शहरातील सर्जन, अस्थिरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आदी रुग्णालयांमध्ये पाठविले जाते. सावित्रीबाई फुले महिला अभियांत्रिकी महाविद्यालयमराठवाड्यातील एकमेव महिला अभियांत्रिकी महाविद्यालयत विद्यार्थिनींना इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग (एम.ई.)चे कोर्स शिकविले जातात. येथे अद्ययावत संगणक कक्ष, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, इंटरनेट सुविधा, शिस्तप्रिय वातावरण, अनुभवी प्राध्यापक, नियमित पालक मेळावा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हायटेक इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीबजाजनगर परिसरातील हायटेक इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग व सिव्हिल इंजिनिअरिंगचे पदवी कोर्स शिकविले जातात. तसेच हायटेक पॉलिटेक्निक येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आॅटोमोबाईल, सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आदी कोर्स शिकविले जातात. धनेश्वरी शैक्षणिक संकुलगेवराई तांडा येथील श्री धनेश्वरी शैक्षणिक संकुलांतर्गत एस.बी.एन.एम. पॉलिटेक्निक कॉलेज, डॉ. वेदप्रकाश पाटील फार्मसी कॉलेज, कृषी महाविद्यालय, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय व कृषी तंत्रनिकेतन, अध्यापक महाविद्यालय, नर्सिंग स्कूल व औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचा समावेश होतो. सुसज्ज ग्रंथालय, इंटरनेट सुविधा व व्हाय-फाय कॅम्पस आदी सुविधा दिल्या आहेत. इन्स्टिट्यूट आॅफ एअर क्राफ्ट मेंटनन्स इंजिनिअरिंगशासकीय तंत्रनिकेतन व आयएएमई यांनी एकत्र निरंतर शिक्षण योजनेंतर्गत एअर क्राफ्ट मेंटनन्स इंजिनिअरिंगचा कोर्स सुरू केला आहे. केंद्र सरकारच्या डायरेक्टर जनरल आॅफ सिव्हिल एव्हिएशन मान्यताप्राप्त हा कोर्स आहे. मागासवर्गीयांना एअर क्राफ्ट मेंटनन्स इंजिनिअरिंगचे मोफत प्रशिक्षण देणारी ही देशातील एकमेव संस्था आहे. आयएएमईच्या मेकॅनिकल शाखा व एबियोनिक्स शाखेत प्रवेश दिला जातो. डॉ. वारे करिअर अकॅडमी वे-आॅफ-सक्सेस अशी थीम असलेल्या डॉ. वारे करिअर अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण दिले जाते. विविध क्षेत्रांत विद्यार्थ्यांना करिअरची वाट निवडण्यासाठी अकॅडमीतर्फे मार्गदर्शन केले जाते. इयत्ता नववी ते बारावीचे नियमित आणि फाऊंडेशन क्लासेस येथे घेतले जातात. येथे डॉ. सचिन वारे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देतात. सृजन इन्स्टिट्यूट आॅफ गेमिंग, मल्टिमीडिया अँड अ‍ॅनिमेशनविद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त संस्थेत मल्टिमीडिया अँड अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, मल्टिमीडिया अँड वेब, वेब डिझाईन, ग्राफिक डिझाईन इत्यादी प्रकारचे डिप्लोमा कोर्सेस शिकवले जातात. अ‍ॅनिमेशन डिझाईन क्षेत्रात करिअर करण्यासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. लोकमतच्या अस्पायर प्रदर्शनात स्टॉलवर शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. हर्ष अँड संजय इंटरनॅशनल स्कूल अँड डिझाईनया अत्याधुनिक स्कूलमध्ये पुरुष व महिलांसाठीचे हेअर कट वरील ७ व १५ दिवसांचे कोर्स शिकविले जातात. याशिवाय हेअर स्पा, हेअर ट्रीटमेंट, डिप्लोमा इन हेअर, बेसिक कोर्स इन स्क्रीन, नेल आर्ट, अरोमाथेरपी, मेकअप सेल्फ ग्रोमिंग, डिप्लोमा इन स्क्रीन केअर, बॉडी स्पा, डिप्लोमा इन सलोन, स्पा मॅनेजमेंटचे ७ दिवसांपासून ते ६० दिवसांपर्यंतचे विविध कोर्स घेतले जातात. या कोर्सला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. औद्योगिक शिक्षण मंडळ, चिंचवड-पुणेशैक्षणिक क्षेत्रातील ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली ही संस्था आहे. येथे एम.बी.ए., एम.एम.एस., पी.जी.डी.एम., एम.एम.एस., पी.जी.डी.एम., एम.एम.एम., एम.पी.एम., एम.सी.ए. (मॅनेजमेंट सायन्स, कॉमर्स), एम.सी.एस., एम.सी.एम. आदी कोर्स शिकविले जातात. मागील ३० वर्षांत ४५ हजार विद्यार्थी उच्चशिक्षित होऊन या संस्थेतून बाहेर पडले आहेत. सी.एन.टी.एस. कॉलेज आॅफ आय.टी. अँड मॅनेजमेंटया कॉलेजमध्ये लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटी व कर्नाटक स्टेट ओपन युनिव्हर्सिटी यांचे विविध पदवी कोर्स व इतर कोर्स घेतले जातात. उल्लेखनीय म्हणजे नोकरी करता करता नागरिकांना हे पदवी कोर्स पूर्ण करता येतात. नोकरी करीत असताना उच्च पदवी मिळवून नोकरीतही प्रमोशन मिळविता येते. हे या कोर्सचे वैशिष्ट्य आहे. मिडास संस्थामिडास संस्थेत उद्योजकता विकास, समुपदेशन, अभिनय आणि नाट्यकला या विषयावरील अभ्यासक्रम शिकविले जातात. यात उद्योजकता विकास या विषयाचे दहा दिवसांपासून ते एक वर्षांच्या कालावधीपर्यंतचे कोर्स आहेत. समुपदेशन या विषयावर तीन दिवस ते पाच दिवसांच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते, तर अभिनय व नाट्यकला या विषयावर दोन महिने ते एक वर्ष अशा विविध कालावधीच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. देवगिरी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटअल्पावधीत नावारूपाला आलेल्या देवगिरी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या कॉलेजमध्ये बी.ई., एम.ई. आणि एम.बी.ए.चे अभ्यासक्रम शिकविले जातात. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग तसेच एम.बी.ए.चा कोर्स येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. येथे प्रशस्त इमारत, अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालय, कॉम्प्युटर रूम आदी सुविधा आहेत. सूर्यदत्ता ग्रुप इन्स्टिट्यूट, पुणेसूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशन ही संस्था देशभरातील नामांकित संस्थांपैकी एक आहे. येथे केजी ते पीजीपर्यंतच्या अभ्यासक्रमाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच हॉटेल मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फॅशन डिझायनिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, मीडिया अँड मास कम्युनिकेशन तसेच एम.बी.ए., पर्सनल मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट आदी कोर्स शिकविले जातात. यासाठी उच्चशिक्षित तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग व संपूर्णपणे शैक्षणिक वातावरण येथील वैशिष्ट्य होय.इंडस् वर्ल्ड स्कूलइंडस् वर्ल्ड स्कूल एक व्यावसायिक मॅनेजमेंटची शाखा आहे. औरंगाबादसह गोरेगाव, हैदराबाद, इंदौर, मंडी, रायपूर, अहमदनगर येथे शाखा आहेत. औरंगाबादेत चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत इंडस् वर्ल्ड स्कूल आहे, तर ज्योतीनगर येथे इंडस् ज्युनिअर स्कूल येथे आहे. दर्जेदार शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता, व्यक्तिमत्त्व विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून येथे सातत्याने उपक्रम राबविले जातात.रिझोनन्स इज्युव्हेंचर प्रा.लि.बाबा पेट्रोल पंप परिसरात रिझोनन्स इज्युव्हेंचर ही संस्था कार्यरत आहे. जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत भारतभर या संस्थेचे सर्वाधिक विद्यार्थी पात्र ठरले आहेत. याशिवाय एआयपीएमटी, एआयआयएम, एनटीएसई, आॅलिम्पियाड या स्पर्धा परीक्षा तसेच नववी ते बारावीपर्यंतेचे क्लासेस येथे घेतले जातात. ओम क्रिएशनजस्ट डायल डॉटकॉमवर पहिल्या ५ स्टार इन्स्टिट्यूटस्पैकी ओम क्रिएशन एक संस्था आहे. आयएसओ ९००१-२००८ प्राप्त केलेली अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील ही एकमेव संस्था आहे. शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये २०११, २०१३ व २०१४ या वर्षात ५ पुरस्कार संस्थेला मिळाले आहेत. कॅड डेकसभारतभरात ८० शाखा असलेली एकमेव कॅड डेकस इन्स्टिट्यूट आहे. येथे आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिक्स, कॅड सॉफ्टवेअर, कॅटिया, थ्रीडी मॅक्स आदी कोर्स शिकविले जातात. अनुभवी प्राध्यापक वर्ग, प्रशस्त ग्रंथालय, कार्यशाळा, दर्जेदार शिक्षण आदी या संस्थेची वैशिष्ट्ये आहेत.