शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

बहुमजली इमारती रडारवर

By admin | Updated: June 24, 2017 00:35 IST

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर परिसरात सध्या सुरू असलेल्या अवैध बांधकामांविरुद्ध सिडको प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर परिसरात सध्या सुरू असलेल्या अवैध बांधकामांविरुद्ध सिडको प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेषत: महानगरातील अनधिकृत बहुमजली इमारती रडारवर असून, अनधिकृत बांधकाम करणाऱ्या मालमत्ताधारकांना बांधकाम काढून घेण्यासंदर्भात प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.सिडको वाळूज महानगरात बहुमजली इमारती बांधण्यास प्रशासनाची कुठलीही परवानगी नसताना अनेक धनदांडग्यांनी अवैधरीत्या बांधकाम करून बहुमजली इमारती उभारल्या आहेत. विशेष बाब म्हणजे काही बड्या अतिक्रमणधारकांनी तर सिडकोच्या जागेतच अतिक्रमण करून इमारती, संरक्षक भिंती बांधल्या आहेत. या अतिक्रमणामुळे एलआयजी व एमआयजी भागातील अंतर्गत रस्ते अरुंद होत चालले असून, रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. सिडकोचे स्थानिक अधिकारी व अतिक्रमणधारकांचे हितसंबंध असल्याने या अनधिकृत बांधकामांकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप काही सुज्ञ नागरिकांकडून केला जात आहे. अनधिकृत बांधकामांसंदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्यास सिडकोचे अधिकारी सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी केवळ पाहणी करून तडजोडअंती निघून जातात. सिडको अधिकाऱ्यांच्या या धोरणामुळे एलआयजी व एमआयजी भागात केवळ पहिल्या मजल्यापर्यंत परवानगी असतानाही याठिकाणी तीन ते चार मजली इमारती बांधल्या आहेत. वाढत्या अनधिकृत बांधकामांची प्रशासनाने दखल घेऊन अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही स्थानिक अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करून अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत.