शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

दर्गाहमध्ये ‘मुगल ग्लास आर्ट’चा ट्रेंड!

By admin | Updated: June 10, 2014 00:57 IST

औरंगाबाद : मुगल बादशाह हुमायू याने भारतात मुगल आर्टला प्रोत्साहन दिले. ही कला भारतातच नव्हे तर विदेशातही लोकप्रिय ठरली.

औरंगाबाद : मुगल बादशाह हुमायू याने भारतात मुगल आर्टला प्रोत्साहन दिले. ही कला भारतातच नव्हे तर विदेशातही लोकप्रिय ठरली. ऐतिहासिक औरंगाबादेत मोठ्या दर्गाहमधील घुमटाच्या आत ‘मुगल ग्लास आर्ट’चे काम करण्याची क्रेझ मागील काही दिवसांमध्ये कमालीची वाढली आहे. तीन महिन्यांमध्ये चार दर्गाहांमध्ये शिशमहल वर्क करण्यात आले असून, उद्या सर्वांत मोठा घुमट असलेल्या शहानूर हमवी दर्गाहमध्ये काम सुरू होत आहे.महाराष्ट्रासह इतर राज्यांतील भाविकांसाठी श्रद्धास्थान असलेल्या शहागंज येथील हजरत निझामोद्दीन औलिया दर्गाहमध्ये २५ दिवसांपूर्वी काम सुरू करण्यात आले. तब्बल ५६ फूट गोलाई असलेल्या घुमटाचे काम आज संपले.‘लोकमत’शी बोलताना कलाकार अब्दुल सत्तार, खालेद मोहंमद, सलमान खान, शब्बीर खान यांनी सांगितले की, या दर्गाहसाठी सुमारे १,२०० फूट काचेचा वापर करण्यात आला. १ बाय ४ च्या आकारातील ग्लास शीटमध्ये हे काम होते. काच वर्षानुवर्षे चिकटून राहण्यासाठी फेव्हिकॉल, वार्निस, पीयूपी, व्हायटिंग आदी साहित्याचा प्रामुख्याने वापर होतो. घुमटाचे माप घेणे, कलाकुसर करण्यापूर्वी डिझाईन तयार करणे आणि त्यानंतर एक-एक काच कापून चिकटवणे, अशा पद्धतीने हे काम केले जाते. गारखेडा परिसरातील हजरत शहानूर हमवी यांच्या दर्गाहचा घुमट शहरात सर्वांत मोठा आहे.या घुमटाच्या आतील बाजूला आणि दर्गाहच्या प्रवेशद्वारासमोर ग्लास वर्क करण्यात येणार आहे. हे काम बुधवारपासून सुरू होईल, असे कलाकारांचे प्रमुख अमीन शेख यांनी नमूद केले.हे काम किमान चार महिने चालणार आहे. सर्व धर्मांचे श्रद्धास्थान असलेल्या या दर्गाहमध्ये दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. अलीकडेच दर्गाहचा ३३७ वा उरूस साजरा करण्यात आल्याची माहिती येथील बुजुर्ग लाला भाई यांनीदिली.देशभरात ग्लास वर्कची क्रेझअमीन शेख यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कारागिरांनी आजपर्यंत देशभरातील १५० हून अधिक दर्गाहच्या घुमटामध्ये ‘मुगल ग्लास आर्ट’चे काम केले आहे. हे काम दिसायला खूपच आकर्षक असते. त्यामुळे अलीकडे याची मागणी खूप वाढलीआहे.सर्वांत अवघड वर्क!कोणत्याही दर्गाहच्या घुमटामध्ये नियोजित डिझाईनमध्ये वेगवेगळ्या रंगांचे काम चिकटवणे सोपे आहे; पण दर्गाहच्या आतील भिंतींवर पवित्र कुराणमधील काही ‘आयात’(अध्याय) लिहिलेले असतात. काचेच्या तुकड्यांमध्ये ते साकारण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अरबी भाषेच्या व्याकरणाला अनुसरून मांडणी करावी लागते. मांडणीत किंचित जरी चूक झाली तरी ती बाब गंभीर मानण्यात येते, असे निझामोद्दीन औलिया दर्गाहमध्ये काम करणाऱ्या कलावंतांनी सांगितले.मुंबईहून आठ कारागिरांचे एक पथक शहरात तीन महिन्यांपूर्वीच आले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या दर्गाहच्या घुमटाचे काम केले. सहा वेगवेगळ्या रंगांमधील हे नेत्रदीपक काम पाहून अनेक जण अवाक् झाले. या कलाकारांचे काम पाहून कोणीही मुगल ग्लास आर्टच्या प्रेमात पडेल एवढे अप्रतिम काम या कलाकारांनी केले आहे. कारागिरांच्या पथकाने शहानूर हमवी दर्गाह परिसरातील एका छोट्या दर्गाहचे काम केले. जुना बाजार हेड पोस्ट आॅफिसजवळ हजरत खाजा सय्यद शाह नुरोद्दीन दर्गाहमधील घुमटाचे काम मागील महिन्यांत पूर्ण केले. हे काम पाहून अनेक भाविक आश्चर्यचकित झाले.