शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

खरिपासाठी मिळाले मुबलक खत

By admin | Updated: June 23, 2014 00:25 IST

भास्कर लांडे , हिंगोली ‘खत दमदार तर पीक जोमदार’ या वाक्याप्रमाणे कृषी विभागाने मागणीनुसार खरीप हंगामातील गरज लक्षात घेवून उत्पादकांसाठी मुबलक खतसाठा उपलब्ध केला आहे.

भास्कर लांडे , हिंगोली‘खत दमदार तर पीक जोमदार’ या वाक्याप्रमाणे कृषी विभागाने मागणीनुसार खरीप हंगामातील गरज लक्षात घेवून उत्पादकांसाठी मुबलक खतसाठा उपलब्ध केला आहे. मागील आठवड्यापर्यंत तुटवडा असणाऱ्या युरियाचा २ हजार २०० मेट्रीक टनाचा रॅक आल्याने त्याची उणीव भरून निघाली. यंदा आवश्यक असलेल्या २५ हजार २०० पेक्षाही अधिक २ हजार मेट्रीक टन खत उत्पादकांसाठी मिळाला. आता जिल्ह्यात तुटवड्याऐवजी खतांच्या वाटपाचे आव्हान कृषी विभागासमोर आहे. हरितक्रांतीपासून रासायनिक खतांचा वापर झपाट्याने वाढला. प्रारंभी उत्पादनात मोठी वाढ होत गेल्याने रासायनिक खतांची मागणी वाढली. हळूहळू या खतांचे दुष्परिणाम समोर येवू लागले. पहिल्यावेळेपेक्षा दुसऱ्यावेळी अधिक मात्रा टाकावी लागते, असा रायायनिक खतांचा नियमच असतो. अन्यथा या खतांचा विधायक परिणाम दिसून येत नाही; पण आजमितीला तर अन्य पर्याय उत्पादकांकडे नसल्यामुळे रासायनिक खतांची मागणी प्रतिवर्षी वाढतच गेली. हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाने निश्चित केलेल्या ३ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी २५ हजार २०० मेट्रीक टन खतांचा पुरवठा अपेक्षित आहे. अद्याप पेरणीला सुरूवात झाली नसताना हंगामात आवश्यक असलेला खत जिल्ह्यास प्राप्त झाला. यंदा प्रामुख्याने युरिया खतांचा तुटवडा सुरूवातीला निर्माण झाला होता; परंतु शुक्रवारी आलेल्या रॅकमध्ये २ हजार २०० मेट्रीक टनाचा साठा मिळाल्याने आवश्यक ६ हजार ५०० पेक्षा ७ हजार ४१० युरिया प्राप्त झाला. त्या खालोखाल डीएपी खतांची उत्पादकांकडून मागणी आहे. डीएपीच्या २ हजार ७०० टनाच्या मागणीपेक्षा अधिक म्हणजे ६ हजार ९३५ मेट्रीक टन खताचा पुरवठा झाला. २०:२०:००, १०:२६:२६ चा पुरवाठा मोठ्या प्रमाणात झाला. दुसरीकडे १०:२०:००:१३ च्या २ हजार २०० मेटन खताची मागणी असताना एकही पिशवी प्राप्त झालेली नाही. १९:१९:१९ आणि १४:३५:१४ खतांची हीच गत असल्याने उत्पादक त्याच्या प्रतिक्षेत आहेत. उलट १७:१७:१७, २०:२०:०:१३, १८:१८:१०, १५:१५:१५:९, १३:१३:०:१६ आणि १६:२०:०:१६ या खतांची जिल्ह्यात एकाही पिशवीचे आवंटन नव्हते; परंतु आजघडीला जिल्ह्यात या खतांचाही पुरवठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. अपेक्षेपेक्षाही अधिक खत मिळाल्याने काळाबाजार किवा उत्पादकांना चढ्या दराने खते खरेदीची गरज राहिलेली नाही. यंदा सर्वच दुकानांवर मुबलक प्रमाणात खते मिळणार आहेत. खत वाटपाचे आव्हानजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खत मिळाला तरी वाटपासाठी कृषी विभागाला जातीने लक्ष घालावे लागते. दुकानदारांकडून कृत्रिम टंचाई दाखवून चढ्यादराने खते विकण्याचे प्रकार घडू शकतात. म्हणून कृषी विभागाने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दुकानांच्या वारंवार तपासण्या करण्याचे आदेश दिले आहेत. खतांच्या काही तक्रारी असणाऱ्यांसाठी तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी तक्रार निवारण केंद्र निर्माण करण्यात आले आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांना दुकानांवर उपस्थित राहून खतांचे वाटप करण्याचे सांगितले आहे. त्यावरही काही तक्रारी असल्यास कृषी विभागाकडून दखल घेतली जाणार आहे. खत(मे.टन) मंजूर प्राप्त वाटप शिल्लकयुरिया ६५०० ७४१४ ३७८५ ३६२९डीएपी २७०० ६९३५ ६१६६ ७६९एसएसपी ४४०० ३३५३ १६२८ १७२५एमओपी २०० ७९९ ३८६ ४१३१५:१५:१५ ४५०० ९०८ ६१८ २९०२०:२०:०० १००० २४८८ १९६० ५२८१६:२०:१३ २२०० ०० ०० ००१०:२६:२६ २२०० ३४२१ २३९८ १०२३१९:१९:१९ २०० ०० ०० ००२४:२४:०० १०० १८८२ १४७८ ४०४१२:३२:१६ ११०० ३५५ २८७ ६८१४:३५:१४ ३०० ०००० ०० ००१७:१७:१७ ०० ७३ ६३ १०१८:१८:१० ०० १३०९ ७७९ ५३०एकूण २५२०० २७६७७ २०२५० ७४२७उत्पादकांनी एकाच कंपनीच्या खतांची मागणी केल्यामुळे युरियाची टंचाई सुरूवातीला जाणवली. आता २२०० मे.टन खत आल्याने युरियाची गरज भासली आहे. खतामधील अन्नद्रव्य, मुलद्रव्य समान असल्यामुळे सर्व कंपन्याची खते चांगला रिझल्ट देतात. उत्पादकांनी एकाच कंपनीच्या खतांचा अट्टाहास धरू नये.- संजय नाब्दे, कृषी विकास अधिकारी