शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

महावितरण मोकळेच !

By admin | Updated: September 25, 2014 00:54 IST

उदगीर : उदगीर शहर व परिसरात विनापरवाना चालणाऱ्या ७ आरामिलवर वनविभागाने कारवाई केली होती़ आरोपींना ताब्यात घेऊन अटकही करण्यात आली़

उदगीर : उदगीर शहर व परिसरात विनापरवाना चालणाऱ्या ७ आरामिलवर वनविभागाने कारवाई केली होती़ आरोपींना ताब्यात घेऊन अटकही करण्यात आली़ परंतु, ज्या महावितरणने या बेकायदा आरामीलला वीज जोडणी दिली ते मात्र अद्याप मोकळेच आहेत़उदगीर शहर परिसरात गेल्या काही वर्षांपासून कोणतीही परवानगी न घेता आरामिल चालविण्यात येत होत्या़ यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली होती़ या याचिकेवरील निर्णयाच्या अनुषंगाने आठवडाभरापूर्वी वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक जी़एस़ साबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी ए़जी़ पाटील, आऱजी़ मुद्दमवार, वन परिमंडळ अधिकारी ए़बी़ पायाळ व कर्मचाऱ्यांनी बेकायदा आरामिलवर धाडी टाकल्या होत्या़ सात ठिकाणी धाडी टाकून तेथील मशीन्स वन विभागाने ताब्यात घेतल्या़ तसेच आरोपी शेख शमशोद्दीन रहीमोद्दीन पटेल, शेख खलील अब्दुल खादर, शेख इरफान उस्मानसाहब, शेख जियाऊल उस्मानसाहब, शेख बबलू अल्लाबक्ष, शेख युनूस शे़हबीब, महमद फारुख महमद ख्वाजा यांना अटक करुन न्यायालसमोर हजर करण्यात आले़ त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली़ दरम्यान, हे आरोपी आता जामिनावर सुटले आहेत़ गेली अनेक वर्षे विना परवाना आरामिल चालत असताना त्यांना महावितरणने सुरळीत वीजपुरवठा केला़ यासंदर्भात वनविभागाने महावितरणला वेळोवेळी पत्र पाठवून संबंधित आरामिल बेकायदा असल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याविषयी कळविले होते़ तरीही महावितरणने यावर कुठलीही कार्यवाही केली नाही़ त्यामुळे बेकायदा वृक्षांची कत्तल करुन आरामिल चालवणाऱ्या आरोपींना सहकार्य केल्याबद्दल महावितरणवरही गुन्हे नोंदविण्याची मागणी होत आहे़१९८५ नंतर मराठवाड्यात एकाही आरामिलला परवानगी देण्यात आली नाही़ तरीही वर्षानुवर्षे बेकायदा आरामिल सुरु होत्या़ वनविभागाने कारवाया करुन उदगीरातील मिल बंद केल्या़ कुठल्याही दडपणाला बळी न पडता वन विभागाने अशाच कारवाया कराव्यात अशी अपेक्षा वृक्षमित्र डॉ़प्रकाश येरमे यांनी व्यक्त केली़ तसेच वन विभागाने वेळोवेळी पत्र देऊनही बेकायदा मिलधारकांची वीज खंडीत न करणाऱ्या महावितरणवर कार्यवाही व्हायलाच हवी, असे मतही वृक्षमित्र येरमे यांनी व्यक्त केले़