शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणने तोडली कृषीपंपाची वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:00 IST

राज्य शासनाने दिवाळीनंतर शेतकºयांना जोराचा झटका देत तालुक्यातील दोन गावांतील कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. दोन्ही गावांत तीन विद्युत रोहित्रांवरुन कृषी पंपाला वीजपुरवठा केला जातो होता. या गावांमध्ये तब्बल १८ लाख रुपयांची थकबाकी असल्याने महावितरणने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, ऐन रब्बी हंगामाच्या पेरण्यांमध्ये शेतकºयांसमोर नवे संकट उभे टाकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : राज्य शासनाने दिवाळीनंतर शेतकºयांना जोराचा झटका देत तालुक्यातील दोन गावांतील कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. दोन्ही गावांत तीन विद्युत रोहित्रांवरुन कृषी पंपाला वीजपुरवठा केला जातो होता. या गावांमध्ये तब्बल १८ लाख रुपयांची थकबाकी असल्याने महावितरणने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, ऐन रब्बी हंगामाच्या पेरण्यांमध्ये शेतकºयांसमोर नवे संकट उभे टाकले आहे.वीज वितरण कंपनीने मागील काही दिवसांपासून वीज बिलाची थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक कामांसाठी वापरण्यात येणाºया विजेची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी तालुक्यात मोहीम राबविली जात आहे. काही दिवसांपूर्वीच वीजपुरवठ्यापोटी ९० लाख रुपयांची थकबाकी असल्याने सहा गावांचा वीजपुरवठा कंपनीने खंडित केला होता. त्यानंतर कंपनीने ही मोहीम आता गतीमान केली आहे. तालुक्यात घरगुती वीज बिलाच्या वसुलीबरोबरच कृषीपंपांच्या वसुलीवरही अधिकाºयांनी भर दिला आहे. कंपनीचे अभियंते आणि लाईनमन गावोगावी फिरत असून, वसुली भरा अन्यथा वीज तोडली जाईल, असा इशारा दिला जात आहे. शनिवारी गोपेगाव आणि निवळी येथील विद्युत रोहित्रांवरुन कृषी पंपासाठी वीजपुरवठा केला जातो. दोन्ही गावात १८ लाख रुपये थकबाकी आहे. २८ आॅक्टोबर रोजी तिन्ही विद्युत रोहित्राचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. त्यामुळे सध्या गावात अंधार आहेत.