शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी विद्यार्थ्यानो इकडे लक्ष द्या; चेकनाक्यावर कोरोना पॉझिटिव्ह येणारे मुकणार परीक्षेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 15:49 IST

रविवारी होणाऱ्या परीक्षेसाठी ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यातून येणार असून त्यांना अँटिजेन तपासणीला सामोरे जावे लागणार आहे.

ठळक मुद्दे काहीजण पॉझिटिव्ह आले, तर त्यांना मात्र परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत नेण्याची कोणतीही सुविधा करण्यात येणार नाही

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गावर, बसस्थानक, रेल्वेस्टेशन येथे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवशांची शनिवारपासून अँटिजेन तपासणी केली जाणार आहे. तथापि, रविवारी होणाऱ्या परीक्षेसाठी ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यातून येणार असून त्यांना अँटिजेन तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. यापैकी काहीजण पॉझिटिव्ह आले, तर त्यांना मात्र परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत नेण्याची कोणतीही सुविधा करण्यात येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

१४ मार्च रोजी होणारी एमपीएससी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आता २१ मार्च रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. औरंगाबादेत ५९ परीक्षा केंद्रांवर १९ हजार ६५६ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. रविवारी सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत ही परीक्षा होणार आहे. रविवारी संपूर्ण दिवस लॉकडाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला येताना पाणी व जेवणाची व्यवस्था स्वत: करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रविवारी या परीक्षेसाठी केंद्रप्रमुख, सहकेंद्रप्रमुख, समन्वयक, पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक, समावेशक, भरारी पथक, लिपिक, वाहनचालक, बेलमन, स्वच्छता कर्मचारी, केअर टेकर, सहायक कर्मचारी आदी १६५० कर्मचारी- अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. तथापि, दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रशिक्षणादरम्यान, केंद्रप्रमुखांसह परीक्षा केंद्रांवर तैनात कर्मचाऱ्यांना ‘आरटीपीसीआर’ तपासणी सक्तीची केली आहे. जिल्हा प्रशासनाची ही सूचना आजपर्यंत कोणीही गांभिर्याने घेतली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत केंद्राध्यक्षांना तीनेवळा स्मरणपत्र दिले असून केंद्रांवरील नियुक्त कर्मचाऱ्यांच्या तपासणीची जबाबदारी आता केंद्राध्यक्षांवर सोपविण्यात आली आहे.

केंद्रांवर ‘पीपीई किट’ची सुविधाया परीक्षेसाठी ५९ केंद्रांवर विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रात येण्यापूर्वीच प्रवेशद्वारात विद्यार्थ्यांचे तापमान व ऑक्सिजन पातळी मोजली जणार आहे. काही विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाबाबतची थोडीशी जरी लक्षणे आढळून आली, तर अशा संशयित विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी वेगळी व्यवस्था केली जाणार आहे. गंभीर लक्षणे दिसणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘पीपीई किट’ घालून परीक्षा देण्याचीदेखिल व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक केंद्रांवर ‘पीपीई किट’ ठेवले जाणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद