शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

पीटलाईनसाठी खासदारांचे प्रेशर : डीआरएम प्रस्ताव पाठवा, पुढे मी पाहतो : भागवत कराड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:02 IST

रेल्वेस्टेशनवर झालेल्या बैठकीस खा. भागवत कराड यांच्यासह माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ‘सीआयआय’चे मुकुंद कुलकर्णी, मसिआचे नारायण पवार, ‘सीएमआयए’चे ...

रेल्वेस्टेशनवर झालेल्या बैठकीस खा. भागवत कराड यांच्यासह माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ‘सीआयआय’चे मुकुंद कुलकर्णी, मसिआचे नारायण पवार, ‘सीएमआयए’चे कमलेश धूत, औरंगाबाद फर्स्टचे हेमंत लांडगे, मध्य रेल्वेचे नांदेड आणि सिकंदराबाद येथील अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर खा. कराड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर सिग्नल कंट्रोल रुम आहे. तर दौलताबादला छावणीची जागा आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पीटलाईन अशक्य आहे. त्यामुळे चिकलठाणा येथे पीटलाईन करण्यासाठी ३० डिसेंबरपूर्वी प्रस्ताव पाठविण्याची सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. जागेअभावी चिकलठाणा येथील प्रस्ताव यापूर्वीच प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. याविषयी उपिंदरसिंग म्हणाले, प्रस्ताव मंजूर करण्याचे काम रेल्वे बोर्डाचे आहे. आमचे काम प्रस्ताव पाठविण्याचे आहे. सर (खा. कराड) प्रेशराईज करत आहे. आम्ही प्रस्ताव पाठवू असे ते म्हणाले.

...अन्यथा मी भूमिपूजन करेन

मनमाड-परभणी या ३२० कि. मी. मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाची निविदाप्रक्रिया पूर्ण झालेली आहे. जानेवारीत रेल्वेमंत्र्याच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन होईल. त्यासाठी रेल्वेमंत्री येतील अथवा आनलाईन पद्धतीने कामाचा प्रारंभ होईल. कोणीही नसेल तर मी करेल, असे खा. कराड म्हणाले.

पार्सल रेल्वे, पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेसचा विस्तार

शहरातील उद्योजकांनी पंतनगर येथे मालवाहतुकीसाठी पार्सल रेल्वेची मागणी केली. त्यावर सकारात्मक दर्शविण्यात आली. पंचवटी एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेसचा औरंगाबादपर्यंत विस्तार करण्याचेही संकेत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले.

बैठकीतील निर्णय

-भांगसीमाता गड परिसरातील रेल्वेमार्गावर भुयारी मार्ग.

-शिवाजीनगर येथील भुयारी मार्गासाठी जिल्हाधिकाऱ्यांची एनओसी घेणे.

-औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर बीड बायपासच्या दिशेने तिकीट कक्ष.