जालना : जालना स्थानकासह बदनापूर, पारडगाव रेल्वेस्थानकांचा विकास करण्यासोबतच इतर मागण्यांचे निवेदन रेल्वेचे महाव्यवस्थापक रवींद्र गुप्ता यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या वतीने देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, परभणी - मनमाड मार्गाच्या दुहेरीकरणासाठी २०१२ मध्ये निधी मंजूर झालेला आहे. हे काम तात्काळ सुरू करावे, नांदेड ते मुंबई दरम्यान विशेष वातानुकूलित रेल्वे सुरू करावी, औरंगाबाद - हैदराबाद रेल्वेची वेळ बदलण्यात यावी, बदनापूर रेल्वेस्थानकासाठी नवीन इमारत बांधण्यात यावी, वाढत्या चोरीच्या घटना पाहता पोलिस चौकीच्या ऐवजी पोलिस ठाणे सुरू करावे, पारडगाव स्थानकाचा विकास करण्यात यावा, जालना स्थानकात एटीएम सुविधा, मेडिकल स्टोअर्स, टेलिफोन, बुथची व्यवस्था करावी, स्थानकाच्या दोन्ही बाजूंनी कँटिनची उभारणी करावी, पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करावी, चार क्रमांकाच्या फलाटावर रेल्वेची इमारत उभारावी,मनमाड ते मुंंबई गोदावरी एक्स्प्रेस जालना येथून सुरू करावी आदी मागण्या करण्यात आल्या. भाजपा जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, भास्कर दानवे, देवीदास देशमुख, अर्जुन गेही, प्रदीप मुथा, गोवर्धन कोल्हे, राजेश जोशी, डोंगरे, तुकाराम चव्हाण यांची नावे आहेत.
पारडगाव स्थानकाची खासदारांकडून दखल
By admin | Updated: December 8, 2015 00:03 IST