शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या कारला लागली आग

By admin | Updated: June 29, 2014 01:00 IST

औरंगाबाद : सर्वाधिक वर्दळीच्या बाबा पेट्रोलपंप चौकात शनिवारी सायंकाळी अचानक धावत्या कारने पेट घेतला.

औरंगाबाद : सर्वाधिक वर्दळीच्या बाबा पेट्रोलपंप चौकात शनिवारी सायंकाळी अचानक धावत्या कारने पेट घेतला. यावेळी सुदैवाने कारचालकासह आतील प्रवाशांना तातडीने कारमधून बाहेर काढण्यात आल्याने कोणालाही दुखापत झाली नाही.अधिक माहिती अशी की, इंडिका कार क्रमांक एमएच-१४ एक्स-६६२० ही रात्री साडेसात वाजेच्या सुमारास क्रांतीचौकाकडून नगरनाक्याकडे जात होती. वाहतूक सिग्नलवर अन्य गाड्यांसोबत ही कारही थांबली होती. त्यावेळी ग्रीन सिग्नल लागताच कारचालकाने गाडी सुरू केली आणि कारचा अ‍ॅक्सिलेटर वाढविले. त्याच वेळी कारच्या इंजिनमधून धूर निघू लागला. वाहतूक नियंत्रण करीत उभे असलेले सहायक पोलीस निरीक्षक शेख अकमल यांचे त्या कारकडे लक्ष गेले. त्यांनी वाहतूक पोलीस संघपाल दाभाडे, एस. बी. काळे यांना ती कार थांबविण्यास सांगितले. पोलिसांनी कारचालकास थांबण्याचा इशारा केला. मात्र, दंडात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस मुद्दामहून आपल्याला अडवीत असल्याचे त्याला वाटले. मात्र, कारच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी कारचालकासह अन्य प्रवाशांना कारमधून उतरविले. तसेच अन्य वाहनांना कारपासून दूर केले. यावेळी वाहतूक पोलिसांनी बाटल्यांनी पाणी ओतून कारला लागलेली आग विझविली. या घटनेत कारचे सुमारे ४० हजारांचे नुकसान झाल्याचे चालकाचे म्हणणे होते. यावेळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. आग विझविल्यानंतर पोलिसांनी वाहतूक पुन्हा सुरळीत केली.काच फोडलीगारखेडा परिसरातील अशोकनगर येथे अनोळखी व्यक्तीने आठवडाभरात तीन कारच्या काचा फोडल्याची घटना ताजी असतानाच हडको एन-११, यादवनगर येथे कारची मागील काच दगड मारून फोडली. हा प्रकार २८ जून रोजी मध्यरात्री घडला.यादवनगर येथील रहिवासी मोहम्मद खलील उर रहेमान यांच्या मालकीची ही कार (क्रमांक एमएच-२० सीएस १२५०) घराच्या बाजूला उभी होती. कारचे आठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार त्यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात दिली.