शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘सीओं’च्या दालनात आंदोलन

By admin | Updated: May 20, 2017 00:47 IST

कळंब : शहरातील कचरा तसेच नाली सफाई न केल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला व शहरात रोगराई पसरत असल्याचा आरोप करीत काही युवकांनी आंदोलन केले

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : शहरातील कचरा तसेच नाली सफाई न केल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला व शहरात रोगराई पसरत असल्याचा आरोप करीत काही युवकांनी आज नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ‘मच्छरदाणी लगाव’ आंदोलन केले.शहरात मागील काही महिन्यांपासून न.प. प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत, नाली सफाई होत नाही, तसेच कीटकनाशकांची फवारणी केलेली नाही. परिणामी शहरातील सर्व भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासांची संख्या वाढून साथीचे आजार होत आहेत. मागील काही दिवसात शहरात यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. नळाला येणारे दूषित पाणीही या रोगप्रसारासाठी कारणीभूत ठरते आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन नगर परिषद प्रशासनाने त्वरित कार्यवाहीचे पाऊल उचलावे, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी नगर परिषदेकडे यावेळी निवेदनाद्वारे केली. निवेदनावर अ‍ॅड. मनोज चोंदे, सुधाकर साबळे, गोविंद चौधरी, गजानन चोंदे, हर्षद अंबुरे, शंकर कदम, शिवप्रसाद बियाणी, गजानन फाटक, दीपक यादव, उदयचंद्र खंडागळे यांच्या सह्या आहेत. यावेळी आंदोलनकर्त्या युवकांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना या अस्वच्छतेचा निषेध म्हणून देण्यासाठी मच्छरदाणी आणली होती. परंतु मुख्याधिकारी कार्यालयात नसल्याने त्यांच्या दालनात ही मच्छरदाणी लावण्यात आली. यानंतरही प्रशासनाने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या युवकांनी दिला.