शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

मुस्लिम समाजातर्फे ठिकठिकाणी आंदोलन

By admin | Updated: October 19, 2016 01:10 IST

पैठण : मुस्लिम समाजास आरक्षण देण्यात यावे व मुस्लिम पर्सनल लॉमध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये, या प्रमुख मागणीसाठी आज जमियत उलेमा हिंद या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने

पैठण : मुस्लिम समाजास आरक्षण देण्यात यावे व मुस्लिम पर्सनल लॉमध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये, या प्रमुख मागणीसाठी आज जमियत उलेमा हिंद या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने येथील शिवाजी चौकात मंगळवारी दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो मुस्लीम बांधवांनी हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्वच आंदोलनात शिस्त व संयम दिसला.येथील शिवाजी चौकात जमियत उलेमा हिंदचे अध्यक्ष मौलाना नदीम सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण तालुका अध्यक्ष मौलाना अन्सार मिल्ली, सचिव ईनामोद्दीन अन्सारी, उपाध्यक्ष काझी कलिमुल्ला, रफिक कादरी, हसनोद्दीन कट्यारे, राजूभाई वीटभट्टीवाले, शहर ए काझी काझी फजलुल्ला, हमीदखान सर, आजिम कट्यारे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली भूमिका मांडून सरकारी हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी केली. मागण्यांचे निवेदन तहसिलदार किशोर देशमुख यांना पदाधिकाऱ्यांनी जाऊन दिले. या आंदोलनात काझी ईनायत उल्ला, असनोद्दीन अन्सारी, वसीम शेख, ऐहसान कादरी, हाजी अकबर साहेब, मेहमूद खतिब, मुश्ताक कुरैशी, हाफिज गाझी, साहेर बागवान, शेख ईरफान, मौलवी सिराज, मौलाना जावेद, अन्नुभाई धांडे, यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.गंगापूर : येथे जमीयत उलेमा हिन्दच्या वतीने गंगापूर शहर व परिसरातील मुस्लिम बांधवानी मुस्लिम समाजासाठीचे हक्काचे आरक्षण मिळावे या मागणीकरीता शांततेत मोर्चा काढून तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. १८ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता गंगापूर शहरातील पोस्ट आॅफिस कार्यालयजवळील शादीखाना येथून प्रत्यक्षात मोर्चास प्रारंभ करण्यात आला. या मोर्चात शहरातील मुस्लिम बांधवांनी शांततेच्या मार्गाने मोर्चात स्वयंप्रेरणेने सहभाग घेतला. शहरातील पोस्ट आॅफिस कार्यालयजवळील शादी खाना येथे मुस्लिम बांधव एकत्र आले. तरुणांनी हातात जमीयत उलेमा हिन्दचा झेंडा व विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चाला सुरुवात केली. एकमिनार चौक, तिन कोनी, राजीव गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसीलच्या दिशेने मार्गस्थ होत असताना शहरातील विविध धर्मातील नागरिकांच्या वतीने मोर्चातील मुस्लिम बांधवांना पिण्याचे पाणी व बिस्किट देण्यात आले. मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यावर मौलवी उलेमा यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण का मिळावे या बाबत मार्गदर्शन केले. तहसील कार्यालयासमोर ३ तास हे आंदोलन सुरु होते. आंदोलकांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना विविध मागण्याचे निवेदन देऊन आपल्या भावना शासन दरबारी कळवाव्या, अशी विनंती केली. उपविभागीय पोलीस अधिकारी शरद बरडे, पोलीस निरीक्षक मुकुंद अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा मार्गात वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुस्लिम समाज या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाला होता तर इतर समाजातील पदाधिकारी व नागरिक देखील या मोर्चादरम्यान सहभागी झाले होते. यातील अनेकांनी मुस्लिम समाजाची मागणी रास्त असून ती शासनाने पूर्ण करावी, अशी मागणी केली. येणाऱ्या काळात ही मागणी लावून धरण्यात येणार असून सदर मागणी तातडीने मार्गी लागली नाही तर जमीयत उलेमा हिन्दतर्फे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला .वैजापूर : येथेही आपल्या विविध मागण्यांसाठी मुस्लिम समाजाने उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते.यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने तहसीलदार सुमन मोरे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात मुस्लीम समाजाला शैक्षणिक विभागात नोकऱ्यांमध्ये, व्यवसायात आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आलीे. या आंदोलनात शहरातील व तालुक्यातील बहुसंख्य मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. या आंदोलनाला सकल मराठा समाजातर्फे पाठिंबा देण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष साबेर खान, अकील शेख, मजीद कुरैशी, अब्दुल बागवान, अहेमद पठाण, हमीद कुरैशी, फेरोज पठाण, अल्ताफ बाबा, राजू काजी, राफे हसन, हाजी गणी, शेख, सय्यद इलियास, जाफर शेख, राजू गनी शेख, एराज शेख, मेराज शेख, रियोजोद्दीन शेख, वाहेद पठाण, राजू पठाण, नदीम शेख, आमिर अली, हाजी अजगर शेख, सलीम वैजापुरी, राजू कुरैशी, दानिश पटेल, आवेज शेख आदींसह मोठ्या संख्येने समाजबांधव हजर होते.