शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प रद्द न केल्यास आंदोलन

By admin | Updated: June 29, 2016 01:08 IST

औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिकांना वेठीस धरणारा प्रकल्प म्हणजे समांतर जलवाहिनी होय. मनपा प्रशासनाने ३० जून रोजीच्या सर्वसाधारण

औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिकांना वेठीस धरणारा प्रकल्प म्हणजे समांतर जलवाहिनी होय. मनपा प्रशासनाने ३० जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत कंत्राटदाराची हकालपट्टी करा असा प्रस्ताव ठेवला आहे. नगरसेवकांनी हा प्रस्ताव मंजूर न केल्यास शहरात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा प्रा. विजय दिवाण यांनी दिला. समांतर पाणीपुरवठा खासगीकरणविरोधी नागरी कृती समितीचा मेळावा मंगळवारी भानुदासराव चव्हाण सभागृहात घेण्यात आला. यावेळी कृती समितीचे सदस्य एच.आर. ठोलिया, प्रदीप पुरंदरे, कलीम अख्तर, मुळावे, विजय सिरसाट, आचार्य यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. दिवाण यांनी सांगितले की, शहरातील पाणीपुरवठ्याचे खाजगीकरण करण्याचे पाप शिवसेना-भाजप युतीने केले. खाजगीकरणातून हा प्रकल्प उभा राहिल्यास सर्वसामान्य नागरिकांना तो अजिबात परवडणार नाही. दरवर्षी ६९ हजार रुपये प्रत्येक नागरिकाला मोजावे लागतील. पगारापेक्षा पाणीपट्टी जास्त अशी वेळ निर्माण होईल. खाजगीकरणाच्या माध्यमातून नागरिकांना हा बोजा लादण्यात येत असतानाही सर्वसामान्य नागरिक या मुद्यावर बोलायला तयार नाही. आपण कोणाला घाबरतो असा प्रश्नही दिवाण यांनी उपस्थित केला. नगरसेवकांनी हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. नगरसेवकांनी प्रकल्प रद्द न करता तो सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला तर समांतरविरोधी आंदोलनाला लोकक्षोभाचे रूप द्यावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी विजय सिरसाट, मुळावे, पुरंदरे, प्रभाकर चौधरी, अण्णासाहेब खंदारे, रमेशभाई खंडागळे, होनकळसे, डॉ. भालचंद्र कानगो यांनीही मनोगत व्यक्त केले. उद्या धरणे आंदोलन समांतर जलवाहिनी प्रकल्पासंदर्भात गुरुवारी महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा सुरू झाल्यावर मनपा मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय मेळाव्यात जाहीर करण्यात आला. सकाळी ११ वाजता धरणे आंदोलनाला सुरुवात होईल.