शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: 'दहा जणांना विचारण्यापेक्षा थेट आंदोलकांशी बोला'; उद्धव ठाकरेंचे सरकारला आवाहन
3
जिओचा आयपीओ कधी येईल? रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी सांगितली तारीख
4
"शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देऊ म्हणणारे गावी पळाले"; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
5
ITR भरण्याची डेडलाइन वाढली! पण 'या' चुका टाळा; नाहीतर ५,००० रुपयांचा बसेल भुर्दंड
6
५०० साड्या, ५० किलो दागिने आणि चांदीची भांडी घेऊन बिग बॉसच्या घरात पोहोचली 'ती'
7
अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त विधान
8
मॅच संपल्यावर सर्व कॅमेरे बंद झालेले! मग भज्जी-श्रीसंत यांच्यातील वादाचा Unseen Video ललित मोदीकडे कसा?
9
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
10
शाळेतील शौचालयात विद्यार्थिनीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ!
11
"रोहित शर्माला संघाबाहेर ठेवण्यासाठीच ब्राँको टेस्ट आणलीये..."; माजी क्रिकेटरचा गंभीर आरोप
12
इस्रायलचा येमनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच हल्ल्यात हुथी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या मृत्यूचा दावा 
13
अजय गोगावलेने गायलं 'देवा श्री गणेशा', रणवीर सिंहने फुल एनर्जीसह केला डान्स; व्हिडिओ व्हायरल
14
'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
15
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
16
मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले...
17
जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
19
"मी लग्न करेन तेव्हा..." कृष्णराज महाडिकांसोबतच्या 'त्या' फोटोवर पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू
20
भलताच ट्विस्ट! ७ दिवस बेपत्ता असलेली श्रद्धा सापडली, बॉयफ्रेंड भेटला नाही म्हणून मित्राशी लग्न

आंदोलनांनी जिल्हा दुमदुमला

By admin | Updated: August 13, 2014 00:46 IST

नांदेड : जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी धरणे आंदोलन केले. याशिवाय मनसे, धनगर समाजानेही आंदोलन केले आहे. एकूणच मंगळवारचा दिवस आंदोलनाचा ठरला.

नांदेड : जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी धरणे आंदोलन केले. याशिवाय मनसे, धनगर समाजानेही आंदोलन केले आहे. एकूणच मंगळवारचा दिवस आंदोलनाचा ठरला. आंदोलनामुळे जिल्हा दुमदुमला आहे. माकपाच्या वतीने रास्ता रोकोइस्लापूर : किनवट तालुक्याला कोरडा दुष्काळ जाहीर करावा, मजुरांच्या हाताला काम द्यावे, वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी शेतीला कुंपणाची व्यवस्था करावी आदी मागण्यांसाठी १२ आॅगस्ट रोजी माकपाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करुन तहसीलदार शिवाजी राठोड यांना निवेदन दिले. आंदोलनात कॉ. अर्जुन आडे, प्रकाश वानखेडे, खंडेराव कानडे, शेषराव ढोले, मोहन जाधव, सुमित्रा वानखेडे, सविता ढोले, लक्ष्मण राठोड, विजय जाधव, अनिल आडे आदी सहभागी होते. सपोनि नितीन कंडारे, फौजदार नवले यांनी बंदोबस्त ठेवला. धरणे आंदोलनअर्धापूर : येथील तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी कृषी खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. आंदोलनात तालुका कृषी अधिकारी एन. टी. गुट्टे, मंडळ कृषी अधिकारी बी. पी. पाटील, कृषी पर्यवेक्षक पवार, मरेवाड, पाटील, कृषी सहाय्यक जाधव, केळकर, सूर्यवंशी, धुतराज, बोरसे, चाभरकर, मुस्तापुरे, भुरके, कवटीकवार, पुरमवार, मुधोळकरमॅडम आदी सहभागी झाले होते. अर्धापूरला मोर्चाअर्धापूर : तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा, या मागणीसाठी मनसेच्या वतीने १२ आॅगस्ट रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाध्यक्ष संभाजी जाधव, बालाजी चव्हाण, तालुकाध्यक्ष बाबाराव मुसळे, राजेश अंभोरे, साईनाथ रामगीरवार, ऋतुराज देशमुख, ज्ञानेश्वर कपाटे, सागर देशमुख, विष्णू कदम, दिनेश लोणे, सदाशिव इंगळे, रवी बोराटे, दादाराव शिंदे, सुधीर काळे, नितीन कदम, विश्वनाथ बोराटे, सदाशिव कपाटे आदी यावेळी उपस्थित होते. तहसीलदारांना मागण्यांचे निवेदनबारड : विविध मागण्यांचे निवेदन मनसेच्या वतीने तहसीलदार किरण अंबेकर यांना देण्यात आले. मुदखेड तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या. निवेदनावर मनसेचे तालुकाध्यक्ष माधव पावडे, मारोती बोदामवाड, संजय कुरे, संजय पवार, बालाजी कल्याणे, शाम कदम, कपील खटींग, कैलास देशमुख, विजय काजळे, सुदर्शन कळणे, शाहूराज मुंगल, माधव मोरे, साईनाथ रामगीरवार, दिनेश लोणे, सुनील कोरबनवाड, योगेश आकमवाड, दत्ता कल्याणकर, गोविंद कल्याणकर, साहेबराव नाद्रे, बाबूराव देशमुख आदी उपस्थित होते. मुखेडला धरणे मुखेड : तालुका कोरडा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा या मागणीसाठी महिला राजसत्ता आंदोलन व दलित हक्क आंदोलनाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील प्रत्येक गाव, तांड्यावर टँकरने पाणी पुरवठा करावा, रोहयोची कामे सुरु करावीत, जनावरांसाठी चारा छावण्या कराव्यात, हवामानावर आधारित पीक विमा लागू करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान द्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात शांताबाई येवतीकर, नागनाथ चव्हाण, बालाजी शिंदे, तुकाराम बाऱ्हाळीकर, माधव शिरसाठ, राहूल गंडले, उज्जेन शिरसाठ, कलावती पाटील, जे.एस. घाटे, शोभा गव्हाणे, आनंद कुंदे, एन.बी. कांबळे, मंगलाबाई थोटे, गवळणबाई शिकारे, राजाबाई शिकारे, अनिता घाटे आदी उपस्थित होते. किनवटला धरणेकिनवट : कृषी सहाय्यक संघटना तालुका किनवट व महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी १२ आॅगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मंडळ अधिकारी वनंजे, भगवान नेमाणीवार, जी.के. टारपे यांच्यासह कृषी सहाय्यक तथा संघटना अध्यक्ष महेश सिंगरवाड, उपाध्यक्षा वंदना मोटरीया, सरचिटणीस विठ्ठल मुपकूलवार, सुनीता मॅकलवार, सुजाता कानिंदे आदींनी सहभाग नोंदविला. हदगावला मोर्चाहदगाव : धनगर व इतर समाजाला आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करु नये, या मागणीसाठी १४ आॅगस्ट रोजी तहसील कार्यालय, एसडीएम कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन आदिवासी युवक कल्याण संघ, आदिवासी सरपंच संघटना, आदिवासी कर्मचारी कृती समिती, आदिवासी मुला- मुलींचे वसतिगृह हदगाव आदींनी केले आहे. हिमायतनगरला आरक्षण बचाओसरसम : आदिवासी समाजात धनगर व इतर समाजाचा समावेश करु नये, या मागणीसाठी माजी आ. भीमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली हिमायतनगरात मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार मंतावार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. माजी जि. प. अध्यक्षा जनाबाई डुडुळे, दादाराव टारपे, अ‍ॅड. बुरकुले, डॉ. भूरके, बाबूराव नाईक यांनी मार्गदर्शन केले. मोर्चासाठी सत्यवृत्त ढोले, एकनाथ बुरकुले, रामदास भडंगे, पांडुरंग दुधाडे आदींनी परिश्रम घेतले. कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आंदोलनसरसम : विविध मागण्यांसाठी कृषीे विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर बेमूदत आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनात तालुका कृषी अधिकारी दावलबाजे, कृषी पर्यवेक्षक लखमोड, पवार, मंडळ कृषी अधिकारी जाधव आदींसह सर्व कर्मचारी सहभागी झाले. कृषी सेवा महासंघाची धरणे आंदोलनभोकर : कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील अधिकरी व कर्मचारी यांच्या विविध मागण्यासाठी कृषी सेवा महासंघाच्यावतीने भोकर तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केले. या मागण्या मान्य न झाल्यास १४ आॅगस्ट पासून बेमुदत संप आंदोलन करण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनात कृषी सेवा महासंघाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. उमरीला कृषी कर्मचाऱ्यांची धरणेउमरी : येथील तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध मागण्ळांसाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनात तालुका कृषी अधिकारी डॉ. मोहम्मद फारूख, कृषी अधिकारी ए. जी. गोरे, मंडळ कृषी अधिकारी ए. एल. कदम, कृषी पर्यवेक्षक आय. के. मोगल, डी. एन. शिंदे, एस. एस. देसाई, एच. बी. गांगुर्डे, पी. पी. येवते, बी. जे. होनवडजकर, ए. एम. मोगल, बी. जे. सर्जे, डी. जी. सोनकांबळे, के. जी. सोनकांबळे, एस. आर. कवटीकवार, कृषी सहाय्यक शिल्पा शिंदे, दीपाली मोरे, शिल्पा बकटे, धम्मज्योती सोनकांबळे आदींनी सहभाग नोंदविला. यावेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार टी. वाय. जाधव यानना मागण्यांचे निवेदन सादर केले. हदगावचे कर्मचारी उद्यापासून संपावरहदगाव : तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी ११ आॅगस्टपासून तहसील कार्यालयासमोरील धरणे आंदोलनात सहभागी झाले. १४ आॅगस्टपासून कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी डी. एम. तपासकर यांनी दिली. धरणे आंदोलनात तालुका कृषी अधिकारी डी. एम. तपासकर, मंडळ कृषी अधिकारी वसंतराव देशमुख, बी. बी. मुंडे, एम. झेड. हुसैन, अंकुश वाकोडे आदी सहभागी झाले आहेत.