नांदेड : केंद्र शासनाने केलेली दरवाढ मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाभरात मोटारसायकल ढकलो आंदोलन करण्यात आले़ माहूरश्रीक्षेत्र माहूर : काँगे्रसचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हाध्यक्ष तथा कापूस पणन महासंघाचे राज्याचे संचालक नामदेवराव केशवे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे मोटरसायकल ओढत नेत आंदोलन करण्यात आले़यावेळी अनंतराव केशवे, नगराध्यक्ष राजेंद्र केशवे, अ़मुनाफ पटेल, किशोर जगत, किसन राठोड, साहेबराव पाटील, सरदार बेग, मंचकराव देशमुख, तानाजी केशवे, आनंदाबाई हिंगाडे, सै़रहेमत अली, अमृत जगताप, दुल्हेखाँ पठाण, थावरा नाईक, प्रतापसिंह चंदेल, साहेबराव जासुद, दत्तात्रय शेरेकर आदी उपस्थित होते़ माहूरच्या टी पॉर्इंट येथून शेकडो मोटरसायकली लोटत रेणुका भक्त निवासपर्यंत नेवून पेट्रोल, डिझेल वाढलेल्या दरांचा आंदोलनरूपी निषेध करण्यात आला़ यावेळी बाबू टेलर, दीपक टाकळीकर, नबी सहाब म़ हनीफ, अल्लाबक्ष, अ़ गफारभाई, राजू सौंदलकर, जगदीश वडसकर, सचिन बेहेरे, लुक्मान भाई, गणपत मडावी, ए़ एच़ शेख, शंकर ठाकरे, संजय गायकवाड, संदीप सुकळकर, आनंदराव कलाने, अरविंद शिंदे, डी़ डी़ चव्हाण, भाग्यवंत भवरे, विलास भंडारे नितीन कन्नलवार, वाय़ आय़ सैय्यद, नागनाथ पवार, सुरेश कोथळकर यांची उपस्थिती होती़ मुखेडमुखेड : मुखेड येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने आ़ हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जि़ प़ अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल ढकलो आंदोलन करण्यात आले़ आमदार संपर्क कार्यालयापासून लातूर रोडवरील हिंदुस्थान पेट्रोल पंपापर्यंत मोटरसायकल ढकलो आंदोलन करण्यात आले़ आ़ बेटमोगरेकर, जि़ प़ अध्यक्ष दिलीप पाटील, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील मंडलापूरकर, शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार, महावीर शिवपुजे, हणमंत नारनाळीकर, उत्तम चौधरी, दत्तात्रय चौधरी, दिलीप कोडगिरे, जे़ टी़ भंगारे, नारायणराव चांडोळकर, शंकर पाटील जांभळीकर, गोविंद भालके, उत्तम बनसोडे, पांडू आडगुलवार, रमजान सौदागर, नागनाथ गायकवाड, मुजीब सय्यद, राजकुमार बामणे, रावसाब पाटील माकणीकर, भाऊसाहेब आगलावे, शंकर चिद्रे, सागर झुरेवार, शिवा बाऱ्हाळे आदी सहभागी झाले होते़ यावेळी तहसीलदार एस़ पी़ घोळवे यांना निवेदन देण्यात आले़ पोलिस निरीक्षक संदीपान शेळके यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता़ धर्माबादधर्माबाद : धर्माबाद शाखा काँग्रेसतर्फे शहरात निषेध रॅली काढून सरकारचा निषेध केला़ दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली़ काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पाटील चिंचोलीकर, वर्णी नागभूषण, विजयकुमार राठोड, नरेंद्र रेड्डी, किरण गौड, चंद्रया गोरजे, ताहेर पठाण, नागोराव पा़ रोशनगावकर, सुधीर येलमे, मारोती माकणे, दिगंबर लखमावाड, यादव पा़ जारीकोटकर, उत्तम पा़ बाचेगावकर, आनंदा कमळेकर आदी उपस्थित होते़ हिमायतनगरहिमायतनगर : येथील परमेश्वर मंदिर कमानीपासून तहसील कार्यालयापर्यंत मोटरसायकल ढकलो आंदोलन करण्यात आले़ पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ तहसीलदार गायकवाड यांना काँग्रेस पक्षाच्यावतीने निवेदन देण्यात आले़ आंदोलनात तालुका काँग्रेस अध्यक्ष जनार्दन ताडेवाड, जि़ प़ सदस्य सुभाष राठोड, पंडितराव पाटील, विकास पाटील, माजी सरपंच शेख चाँदभाई, ज्ञानेश्वर शिंदे, उपसरपंच जावेद खान, माजी जि़ प़ सदस्य समदखान पठाण, दिलीप शिंदे, अ़ मन्नान, संजय माने, संजय पाटील दूधडकर, पं़ स़ सभापती वामनराव वानखेडे, उपसभापती बिच्चेवार, पंस़ लक्ष्मीबाई भवरे, रफीक सेठ, गणेशराव शिंदे, सुनील चव्हाण आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)
काँग्रेसचे जिल्हाभरात आंदोलन
By admin | Updated: July 7, 2014 00:20 IST